अरबाजने बनवला निक्कीसाठी टोमॅटोचा हार्ट; कोकण हार्टेड गर्लेने दिला त्याला फोडणीचा तडका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 04:52 PM2024-08-01T16:52:00+5:302024-08-01T16:54:50+5:30

सध्या मनोरंजन विश्वात 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाची जोरदार चर्चा रंगली आहे.

bigg boss marathi season 5 contestant arbaaz made tomato heart for nikki tamboli video viral | अरबाजने बनवला निक्कीसाठी टोमॅटोचा हार्ट; कोकण हार्टेड गर्लेने दिला त्याला फोडणीचा तडका

अरबाजने बनवला निक्कीसाठी टोमॅटोचा हार्ट; कोकण हार्टेड गर्लेने दिला त्याला फोडणीचा तडका

Bigg Boss Marathi Season 5 : सध्या मनोरंजन विश्वात 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, बिग बॉसच्या पाचव्या पर्वात नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पहिल्याच दिवसापासून या कार्यक्रमात स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपली होती. हे नवं पर्व सुरू झाल्यापासून घरातील सदस्यांना अनेक सरप्राईज मिळत आहेत. सुरुवातीला वर्षा उसगावकर आणि निक्कीमध्ये मेकअप वरून वादाची ठिणगी पडली. त्यानंतर घरात इतर स्पर्धकांमध्ये मतभेद सुरू झाले. पण या व्यतिरिक्त या घरामध्ये एक नवी जोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते आहे.


कलर्स मराठी वाहिनीवर या बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व सुरू झालं आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. अरबाज आणि निक्की एकमेंकाना फ्लर्ट करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये अरबाज पटेल, निक्की तांबोळी आणि अंकिता वालावकर किचनमध्ये दिसत आहेत. तर अरबाज निक्की तांबोळीला इम्प्रेस करण्यासाठी तिच्यासाठी  टोमॅटोचा हार्ट बनवत आहे. 

सध्या सोशल मीडियावर अरबाजने निक्कीसाठी बनवलेल्या टोमॅटो हार्टची चर्चा होताना दिसते.  व्हिडीओमध्ये अरबाज टोमॅटो कापून त्यापासून हार्ट शेप तयार करतो. निक्कीला मी तुझ्यासाठी टोमॅटोचा दिल बनवला आहे असं सांगतो. त्यावर निक्की म्हणते, तुझ्याकडे दिल आहे का? उत्तर देताना अरबाज म्हणतो, हो माझ्याकडे दिल आहे. अशातच कोकण हार्टेड गर्ल अरबाजचा  दिल तोडून त्याच टोमॅटोची फोडणी देताना दिसते आहे. 

सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडीओ चांगलाच गाजत आहे. शिवाय चाहत्यांकडून निक्की आणि अरबाजच्या जोडीला पसंती देखील मिळते आहे.  या पर्वाच्या पहिल्याच दिवसापासून अरबाज निक्कीवर फिदा असल्याचं दिसतंय. त्यामुळे या पर्वात यांत नातं फुलणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक-

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. 

Web Title: bigg boss marathi season 5 contestant arbaaz made tomato heart for nikki tamboli video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.