"दाजींमुळे आज मी...", जान्हवी किल्लेकरच्या घरी आल्यावर छोटा पुढारी काय म्हणाला? व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 12:19 PM2024-11-12T12:19:18+5:302024-11-12T12:22:02+5:30

'बिग बॉस मराठी' फेम छोटा पुढारी म्हणजेच घन:श्यामने नुकतीच जान्हवी किल्लेकरची भेट  घेतली.

bigg boss marathi season 5 contestants ghanshyam darode meets jahnavi killekar in mumbai video viral on social media | "दाजींमुळे आज मी...", जान्हवी किल्लेकरच्या घरी आल्यावर छोटा पुढारी काय म्हणाला? व्हिडीओ व्हायरल

"दाजींमुळे आज मी...", जान्हवी किल्लेकरच्या घरी आल्यावर छोटा पुढारी काय म्हणाला? व्हिडीओ व्हायरल

Ghanashyam Darode: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या सीझनने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर ते कीर्तनकार यांसारखे स्पर्धक या पर्वात पाहायला मिळाले. त्यातील प्रत्येकाने आपआपल्या स्टाईलने प्रेक्षकांच्या आपली छाप पाडली. अगदी महिनाभरापूर्वीच या कार्यक्रमाने निरोप घेतला. असं असूनही त्यातील स्पर्धक मात्र कायमच चर्चेत येताना दिसत आहे. शो संपल्यानंतर त्यांचं एकमेकांच्या भेटीगाठी घेण्याचं सत्र सुरूच  आहे. दरम्यान, अलिकडेच छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरोडने(Ghanshyam Darode) निक्की-अरबाजची भेट घेतली. आपल्या कामानिमित्त मुंबईत आल्याने त्याने आपल्या मित्रांची भेटली. त्यानंतर आता छोटा पुढारी जान्हवी किल्लेकरच्या (Jahnavi Killekar) घरी पोहोचला आहे.


घन:श्याम दरोडेने जान्हवीची भेट घेतल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जान्हवीच्या घरी गेल्यानंतर त्याचा चांगला पाहुणचारही करण्यात आला. व्हिडीओद्वारे घन:श्यामने जान्हवी आणि तिच्या नवऱ्याचे मनापासून आभार मानले आहेत. शिवाय व्हिडीओमध्ये जान्हवी- घन:श्याम मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसत आहेत. 

"Task queen जान्हवी किल्लेकर ग्रेट भेट...!" असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. घन:श्याम च्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 

Web Title: bigg boss marathi season 5 contestants ghanshyam darode meets jahnavi killekar in mumbai video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.