'कोकण हार्टेड गर्ल'ची नवी इनिंग! नव्या मराठी मालिकेसाठी अंकिताने लिहिलं शीर्षक गीत; व्हिडीओ केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:23 IST2024-12-13T11:20:40+5:302024-12-13T11:23:41+5:30
महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वाची (Bigg Boss Marathi Season 5) चर्चा रंगली होती.

'कोकण हार्टेड गर्ल'ची नवी इनिंग! नव्या मराठी मालिकेसाठी अंकिताने लिहिलं शीर्षक गीत; व्हिडीओ केला शेअर
Ankita Prabhu Walawalkar: महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वाची (Bigg Boss Marathi Season 5) चर्चा रंगली होती. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्यातील स्पर्धक कायमच चर्चेत असतात. दरम्यान, यंदा 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी होऊन 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) नावारुपाला आली. सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता या शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. तिच्या लोकप्रियतेतही कमालीची वाढ झाली. लवकरच अंकिता लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच नुकताच अंकिताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून तिच्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने नव्या क्षेत्रात पाऊल ठेवल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिताने आपली लिखाणाची आवड जोपासत एका मालिकेसाठी टायटल सॉंग लिहिलं आहे. झी मराठीवरील आगामी 'लक्ष्मी निवास' मालिकेचं शीर्षक गीत लिहिण्याची धुरा तिने सांभाळली आहे.
दरम्यान, अंकिताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणते, "नमस्कार मंडळी! लवकरच एक नवी मालिका भेटीला येते आहे. या मालिकेचं नाव आहे 'लक्ष्मी निवास. हा प्रमोशनल व्हिडीओ नाही तर त्या मालिकेच्या प्रोमोसाठी मी गाणं लिहिलं आहे. मी लिहिलेलं हे गाणं हर्षवर्धन वावरे यांनी गायल आहे. शिवाय कुणाल-करण यांनी हे गाणं कंपोझ केलंय."
अंकिताने लिहिलेलं शीर्षक गीत
स्वप्न सारे पाहिले
घर आनंदाचे
आधार नात्यांना भासतो
दुःख भारी वाटते
स्वप्न थोडे अडखळते
वेळ संयमाची वाटते
घर हे दिसती चार भिंती जणू
पण ही भावनांची कुस वीणू
सावरु
स्वप्न पुन्हा पाहण्या
सुखाची या
गोष्ट पुन्हा लिहिण्या
बंध ते जे सुख बोलती
मखमली स्वप्नांचे लक्ष्मी निवास ते