'परदेसी गर्ल'ला पडली बाप्पाची भुरळ; गणरायाची मूर्ती रंगवण्यात रमली इरिना, नेटकऱ्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 12:40 PM2024-09-06T12:40:02+5:302024-09-06T12:44:33+5:30

'बिग बॉस मराठी' फेम 'परदेसी गर्ल' इरिना रुडाकोवाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

bigg boss marathi season 5 fame irina rudakova shared video on social media while enjoyed painting of ganpati bappa idol | 'परदेसी गर्ल'ला पडली बाप्पाची भुरळ; गणरायाची मूर्ती रंगवण्यात रमली इरिना, नेटकऱ्यांकडून कौतुक

'परदेसी गर्ल'ला पडली बाप्पाची भुरळ; गणरायाची मूर्ती रंगवण्यात रमली इरिना, नेटकऱ्यांकडून कौतुक

Irina Rudakova Video :गणेशोत्सवाला शनिवारी प्रारंभ होणार असला तरी त्या अगोदरच या उत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. लाडक्या गणरायाच्या  स्वागतासाठी भाविकांची जय्यत तयारी सुरू आहे. अशातच 'बिग बॉस मराठी' फेम 'परदेसी गर्ल' इरिना रुडाकोवाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. इरिनाचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे.


सध्या सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी' फेम इरिना रुडाकोवाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती गणपती बाप्पाच्या मूर्तीला रंगरंगोटी करताना दिसतेय. हातात पेंटींगचे ब्रश घेत 'परदेसी गर्ल' बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. इरिनाने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

परदेशात जन्म होऊनही इरिनाला भारतीय संस्कृतीचा प्रचंड अभिमान आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात असताना मी एकदशीचे उपवासही करते, असा खुलासा तिने केला होता. तिच्या या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. 

यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात इरिनाने एन्ट्री घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. मुळची रशियाची असणारी इरिना सध्या भारतातच वास्तव्यास आहे. भारत देशाबद्दल तिला प्रचंड प्रेम आहे, याची प्रचिती अनेकदा येते. महाराष्ट्रात राहून तेथील प्रथा,परंपरा जपण्याचा इरिनाचा स्वभाव नेटकऱ्यांना खूपच भावलाय. 

सध्या 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला एक महिना पूर्ण झाला असून आता सहावा आठवडा सुरू झाला आहे. या शोच्या चौथ्या आठवड्यामध्ये एविक्शन पार पडलं. या एविक्शनमधून 'परदेसी गर्ल'  इरिना रुडाकोवा घराबाहेर गेली. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील इरिनाचा प्रवास थांबला. 

Web Title: bigg boss marathi season 5 fame irina rudakova shared video on social media while enjoyed painting of ganpati bappa idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.