"बिग बॉस मराठी विनर..." या स्पर्धकासाठी 'मुंबईच्या राजा' चरणी चाहत्याचं साकडं; चिठ्ठीत असं काय लिहलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 12:42 PM2024-09-17T12:42:01+5:302024-09-17T12:48:09+5:30

Bigg Boss Mararthi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या एका चाहत्याने त्याचा आवडता स्पर्धक यंदाचं पर्व जिंकावा यासाठी चक्क बाप्पाकडे साकडं घातलं आहे.

bigg boss marathi season 5 fan prayers for paddy kamble to the mumbai cha raja to win this show what was written in the note post viral on social media | "बिग बॉस मराठी विनर..." या स्पर्धकासाठी 'मुंबईच्या राजा' चरणी चाहत्याचं साकडं; चिठ्ठीत असं काय लिहलं?

"बिग बॉस मराठी विनर..." या स्पर्धकासाठी 'मुंबईच्या राजा' चरणी चाहत्याचं साकडं; चिठ्ठीत असं काय लिहलं?

Bigg Boss Mararthi Season 5 : 'बिग बॉस मराठी' च्या  यंदाच्या पर्वाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसते. अगदी अल्पावधीत हा शो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या शोप्रमाणे त्यातील स्पर्धकही आपल्या खेळीने चाहत्यांची मनं जिंकत आहेत. त्यासाठी आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी नेटकऱ्यांसह 'बिग बॉस मराठी'चे प्रेक्षक वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. अशातच एका 'बिग बॉस मराठी'च्या चाहत्याने त्याचा आवडता स्पर्धक यंदाचं पर्व जिंकावा यासाठी चक्क बाप्पाकडे साकडं घातलं आहे. याचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. या चाहत्याने 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा स्पर्धक पॅडी कांबळेसाठी गणरायाकडे प्रार्थना केली आहे. 


दरवर्षी मुंबईत गणेशोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडतो. गणेशाचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र उत्साह, जल्लोषाने वातावरण भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. प्रत्येक जण आपापल्यापरीने गणेशाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. खासकरून सोशल मीडियावरही प्रत्येक जण गणरायांप्रती असलेला भावभक्तीचा जागर करताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर बाप्पाच्या आगमनाच्या पोस्ट, फोटो, सजावट यांची एकच क्लिक-क्लिक सुरू आहे.  दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज, मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान,  बाप्पाला निरोप देताना एका चाहत्याने 'मुंबईच्या राजा' चरणी एक चिठ्ठी लिहून त्यामध्ये 'पॅडी' कांबळेसाठी प्रार्थना केल्याचं दिसतंय. या चिठ्ठीमध्ये पॅडीच्या चाहत्याने लिहलंय, "Bigg Boss Marathi Season 5 Winner आपला पॅडी दादा". पॅडने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. 

पाहायला गेल्यास, 'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमध्ये 'पॅडी' कांबळे या नावाने मनोरंजन विश्वात लोकप्रिय असलेला अभिनेता पंढरीनाथ कांबळे सहभागी आहे. पॅडीला आपण विविध मालिका, नाटकं, सिनेमांमध्ये आजवर पाहिलंय. पॅडी 'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Web Title: bigg boss marathi season 5 fan prayers for paddy kamble to the mumbai cha raja to win this show what was written in the note post viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.