VIDEO : मोदक मिळताच सूरजला आठवला बाप्पा! केलं असं काही की नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 03:31 PM2024-09-09T15:31:51+5:302024-09-09T15:37:41+5:30

सोशल मीडियावर सूरजचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. 

bigg boss marathi season 5 ganpati special episode contestants suraj chavan placed the modak in front of bappa video viral netizens react | VIDEO : मोदक मिळताच सूरजला आठवला बाप्पा! केलं असं काही की नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक 

VIDEO : मोदक मिळताच सूरजला आठवला बाप्पा! केलं असं काही की नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक 

Suraj Chavan Viral Video : 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनप्रमाणे त्यातील स्पर्धकही चांगलेच चर्चेत येत आहे. प्रत्येकाची स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्यांचा घरातील वावर त्यावर नेटकरी सोशल मीडियाच्या आधारे व्यक्त होताना दिसतात. त्यातच प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक चर्चा रंगलीये ती म्हणजे गुलिगत धोका फेम सूरज चव्हाणची. रिलस्टार सूरज चव्हाणने आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकल्याचं पाहायला मिळतंय. अशातच सोशल मीडियावर सूरजचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. 


दरम्यान, सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना 'बिग बॉस'च्या घरातही गणरायाचं आगमन झालं आहे. अशातच लाडक्या गणराच्या  स्वागतासाठी 'बिग बॉस'चं अख्खं घर सज्ज झाल्याचं पाहायला मिळालं. काल रविवारी 'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर गणेशोत्सव स्पेशल एपिसोड पार पडला. या एपिसोडमध्ये सूरज चव्हाणने केलेल्या एका कृतीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

सोशल मीडियावर सूरजचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये अरबाज घरातील सगळ्या सदस्यांसाठी मोदकाचा प्रसाद घेऊन येतो. प्रसादाचा वाटप झाल्यानंतर घरातील इतर स्पर्धक मोदकाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. पण, सूरजला या क्षणी बाप्पा आठवतो. आपल्याला प्रसादात मिळालेला मोदक तो स्वत न खाता  बाप्पाच्या पुढे नैवेद्य म्हणून ठेवतो.  त्यानंतर तो गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो. सूरजच्या या कृतीचं नेटकरी खूप कौतुक करत आहेत. शिवाय रितेश देखील  सूरजचा साधेपणा पाहून भारावला आहे. 

दरम्यान, नवीन कॅप्टन येईपर्यंत सूरज सध्या घराचा कॅप्टन असणार आहे. या पर्वाच्या सुरूवातीचे दोन आठवडे सूरज अगदीच शांत होता. त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेशने त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत केली.आता मात्र, सूरज पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. 

Web Title: bigg boss marathi season 5 ganpati special episode contestants suraj chavan placed the modak in front of bappa video viral netizens react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.