ट्रॉफी नाहीतर Money Bag उचलून कोणी घेतली स्पर्धेतून माघार ? 'या' स्पर्धकाच्या नावाची चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 05:14 PM2024-10-06T17:14:22+5:302024-10-06T17:15:41+5:30
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहा फायनलिस्ट आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनच्या (Bigg Boss Marathi Season 5) ग्रँड फिनालेला अवघे काही तास बाकी आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहा फायनलिस्ट आहेत. सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार हे सहा सदस्य ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत. पण, यांच्यापैकी एकच जण हा ट्रॉफी उचलू शकणार आहे. आता या सहा सदस्यांपैकी दोन सदस्य हे टॉप तीनमधून बाहेर पडल्याचं बोललं जात आहे. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या सदस्याने ट्राफीसाठी न थांबता Money Bag निवडून स्पर्धेतून माघार घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, अंकिता प्रभु-वालावलकर आणि धनंजय पवार यांना टाॅप 3 मध्ये स्थान मिळालेले नाही. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या जान्हवीने Money Bag उचलून स्पर्धेतून माघार घेतल्याचं बोललं जात आहे. 'बिग बॉस मराठी'च्या प्रत्येक सीझनमध्ये अंतिम फेरीत Money Bag उचलून एका सदस्याला घराबाहेर पडण्याची संधी मिळते. या टास्कमध्ये स्पर्धकांना जास्तीत जास्त रक्कम जिंकण्याची संधी असते. यंदा ही Money Bag जान्हवीने निवडली असल्याची चर्चा आहे. पण, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या चर्चामध्ये किती तथ्य आहे, हे आपल्याला 'बिग बॉस मराठी'च्या फिनालेमध्ये पाहायला मिळेल.
'बिग बॉस मराठी' च्या टॉप तीनमध्ये सुरज, अभिजीत आणि निक्की पोहचल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, 'बिग बॉस मराठी 5' च्या विजेत्याला झगमगत्या ट्रॉफीसह १४.६ लाख एवढी धनराशी मिळणार आहे. आज सायंकाळी ६ वाजता ग्रँड फिनालेला ( Bigg Boss Marathi ) सुरुवात होईल. 'बिग बॉस मराठी'चा ग्रँड फिनाले प्रेक्षकांना 'कलर्स मराठी' वाहिनीवर आणि विनामूल्य 'जिओ सिनेमा'वर पाहता येणार आहे. आता शेवटच्या क्षणी कोण बाजी मारत 'बिग बॉस मराठी'च्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.