"मी एकदम साधा माणूस, पण राग आला तर..."; गोलीगत सूरज चव्हाण स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 13:11 IST2024-09-13T13:10:36+5:302024-09-13T13:11:05+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस'च्या घरात न बोलणारा सूरज चव्हाण आता हळूहळू बोलायला लागलेला आहे.

"मी एकदम साधा माणूस, पण राग आला तर..."; गोलीगत सूरज चव्हाण स्पष्टच बोलला
Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरातील गोलीगत सूरज चव्हाण(Suraj Chavan)ने अल्पावधीतच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आजच्या भागात सूरज पॅडी दादा आणि अंकितासोबत गप्पा मारताना तो दिसून येणार आहे. यावेळी तो सांगताना दिसतो आहे की, मी एकदम साधा माणूस आहे पण राग आला तर मी मागेपुढे बघत नाही.
बिग बॉसच्या घरात सूरज म्हणतोय, "मला गाव महत्त्वाचं आहे. कधी गावाकडे जातोय आणि सर्वांना भेटतोय असे मला झाले आहे. इथे नुसता आरडाओरडा सुरू असतो". त्यावर अंकिता म्हणते,"आपल्या भावनांवर कंट्रोल करणे गरजेचे आहे". सूरज पुढे म्हणतो की, "मी एकदम साधा माणूस आहे. पण राग आला तर मी मागचं पुढचं बघत नाही. इथे मी स्वत:ला खूप कंट्रोल केले आहे". त्यानंतर सूरज पॅडी दादांची मसाज करताना दिसून येतो. सूरजचा मसाज पाहून पॅडी दादा म्हणतात,"तुला मसाज काय असतो तेच दाखवतो". 'बिग बॉस'च्या घरात न बोलणारा सूरज चव्हाण आता हळूहळू बोलायला लागलेला आहे.
बिग बॉस देणार मोठी शिक्षा
घरात नुकताच पार पडलेल्या कॅप्टनसी टास्कने सर्वांनाच मोठा धक्का दिलाय. कॅप्टनसी टास्कदरम्यान आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावल्याने बिग बॉस तिला काय शिक्षा देणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"घरात आर्या आणि निक्की यांच्यामध्ये एक निंदनीय घटना घडली. आर्या यांनी हे निंदनीय कृत्य करुन बिग बॉसच्या मुलभूत नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बिग बॉस आर्या यांना आता शिक्षा ठोठावत आहे". कानशिलात लगावल्यानंतर निक्कीने बिग बॉसला आर्याला घरी पाठवा अशी विनंती केली होती. आता बिग बॉस काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.