बिग बॉसच्या घरात अरबाज-निक्कीमध्ये फुलतंय प्रेम?, योगिता चव्हाण म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 06:39 PM2024-08-21T18:39:15+5:302024-08-21T18:39:54+5:30
Bigg Boss Marathi Season 5 Yogita Chavan : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या योगिता चव्हाण हिने अरबाज आणि निक्की यांच्या नात्यावर भाष्य केले आहे.
कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) काही दिवसांपूर्वी भेटीला आला. या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच प्रेमाचे वारे वाहताना दिसले.अरबाज (Arbaz Patel) आणि निक्की (Nikki Tamboli) एकमेंकांसोबत फ्लर्ट करताना दिसले. इतकेच नाही तर अरबाजने निक्की तांबोळीला इम्प्रेस करण्यासाठी टोमॅटोचा हार्ट बनवला होता. कधी त्यांच्यात प्रेम तर कधी कधी त्यांच्यात वाददेखील होताना दिसतात. दरम्यान आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या योगिता चव्हाण (Yogita Chavan) हिने अरबाज आणि निक्की यांच्या नात्यावर भाष्य केले आहे.
मराठी वर्ल्डला दिलेल्या मुलाखतीत योगिता चव्हाण हिने खुलासा केला आहे. तिने म्हटले की, अरबाज खूप भावनिक आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी तो बहिणीच्या आठवणीत रडला होता. घरात बऱ्याच गोष्टी आहेत. ज्या पर्सनल आहेत त्या मला स्पष्ट बोलता येणार नाहीत. बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलमध्ये जे चाललेले असते ते मला खोटं वाटतं. खरं वाटत नाही. तो मान्यदेखील करत नाही. त्यामुळे जजही करू शकत नाही. बाहेर आल्यावर आणखी जास्त गोष्टी कळल्या, त्यामुळे मी त्याला जास्त जज केलं. कुठेतरी १० टक्के मला वाटतं की तो चांगला खेळू शकतो. पण स्वतःची चूक मान्य करत नाही. रितेश सर चुका सांगतात पण ते हसण्यावर नेतात.
योगिता चव्हाणसोबत निखिल दामलेही पडला घराबाहेर
दरम्यान, बिग बॉस मराठीचा चौथा आठवडा सुरू झाला असून दिवसेंदिवस हा खेळ अधिक मनोरंजक होत चालला आहे. त्याबरोबरच घरातील सदस्यांची समीकरणंही बदलत असल्याचं पाहायला मिळत आहेत. योगिता चव्हाणसोबत निखिल दामलेचाही बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला आहे. या आठवड्यात घराचा कॅप्टन झाल्यामुळे अरबाज पटेल सुरक्षित असेल. त्यामुळे आता कोणत्या सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार असेल, हे पाहणे कमालीचे ठरेल.