Jahnavi Killekar : "मी तुमच्या विरोधातच खेळणार"; जान्हवीला मिळाला धोका, वैभव-अरबाजला ठणकावत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 01:33 PM2024-09-12T13:33:21+5:302024-09-12T13:46:47+5:30

Bigg Boss Marathi Season 5 And Jahnavi Killekar : कॅप्टन्सी टास्कमध्ये आपल्याच मित्रांकडून धोका मिळाल्याने जान्हवी प्रचंड नाराज झाली आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar captaincy task promo | Jahnavi Killekar : "मी तुमच्या विरोधातच खेळणार"; जान्हवीला मिळाला धोका, वैभव-अरबाजला ठणकावत म्हणाली...

Jahnavi Killekar : "मी तुमच्या विरोधातच खेळणार"; जान्हवीला मिळाला धोका, वैभव-अरबाजला ठणकावत म्हणाली...

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये रोजच धमाल पाहायला मिळत आहे. सध्या घरात कॅप्टन्सी टास्क सुरू आहे. कॅप्टन्सी टास्कसाठी दोन टीम करण्यात आल्या आहेत. टीम A मध्ये अरबाज, निक्की, वैभव, धनंजय, वर्षा आणि सूरज हे आहेत. तर टीम B मध्ये अभिजीत, अंकिता, संग्राम, जान्हवी, आर्या आणि पॅडी हे आहेत. या टास्कमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही टीममझील सदस्य एकमेकांना भिडताना दिसले.

कॅप्टन्सी टास्कदरम्यान अभिजीत-निक्की, अरबाज-पॅडी यांच्यासह अनेक सदस्यांमध्ये टोकाचा वाद झाला. टीम A ने बाजी मारत सुरुवातीला अभिजीत आणि संग्रामला बाद केलं. दुसऱ्या फेरीत पुन्हा एकदा अरबाजनेच बजर दाबल्याने टीम A ला संधी मिळाली. तेव्हा जान्हवीला बाद करण्यात आलं. कॅप्टन्सी टास्कमध्ये आपल्याच मित्रांकडून धोका मिळाल्याने जान्हवी प्रचंड नाराज झाली आहे. 


बिग बॉसच्या घरात आल्यापासून जान्हवी ही टीम A सोबत खेळत होती. निक्की, अरबाज, वैभव हे तिच्या जवळचे होते. पण नंतर निक्की आणि जान्हवीचं भांडण झालं. जान्हवीला एक आठवडा जेलमध्ये राहण्याची देखील शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर आता ती एकटी तिचा गेम खेळते. मात्र अरबाज आणि वैभवने कॅप्टन्सीच्या उमेदवारीतून तिला बाद केल्यानंतर ती नाराज झाली आहे. तिने तिच्या मनातील भावना अरबाज आणि वैभवसमोर बोलून दाखवल्या. 

जान्हवी, वैभव आणि अरबाज हे एकत्र बसलेले पाहायला मिळत आहेत. त्यावेळी जान्हवीने "तुम्ही सेकेंड राऊंडला मला उडवलंत कॅप्टन्सीमधून... माझं नाव का?" असा प्रश्न दोघांना विचारला. त्यावर वैभवने "तुला काढायचं हे निक्कीने ठरवलं" असं उत्तर दिलं. हे ऐकून जान्हवी नाराज होते आणि पुढे म्हणते, "निक्कीला माझ्या कॅप्टन्सीबद्दल काय प्रॉब्लेम आहे? मला माहिती आहे मी आता एकटी खेळतेय… पण, आपल्यात एक मैत्रीचं नातं होतं ना? तुम्हाला मी आताच सांगतेय... याच्यापुढे मी तुमच्या विरोधातच खेळणार आहे. त्यामुळे आता आपण एकमेकांच्या विरोधातच राहूया..." या आठवड्यात घराचा कॅप्टन नेमकं कोण होणार हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 
 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar captaincy task promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.