Bigg Boss Marathi Season 5: भाऊच्या धक्क्यावर रितेशने सुनावल्यानंतर जान्हवीला आली चक्कर, नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 01:29 PM2024-08-11T13:29:22+5:302024-08-11T13:30:04+5:30

Bigg Boss Marathi Season 5: जान्हवी किल्लेकरचा आगाऊपणा नडला, आता आली चक्कर

Bigg Boss Marathi Season 5 Janhvi Killekar got dizzy after Ritesh Deshmukh scolded her | Bigg Boss Marathi Season 5: भाऊच्या धक्क्यावर रितेशने सुनावल्यानंतर जान्हवीला आली चक्कर, नेटकरी म्हणाले...

Bigg Boss Marathi Season 5: भाऊच्या धक्क्यावर रितेशने सुनावल्यानंतर जान्हवीला आली चक्कर, नेटकरी म्हणाले...

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा (Bigg Boss Marathi 5) सध्या दुसरा आठवडा सुरु आहे. पहिल्यात आठवड्यात रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर निक्की तांबोळीची चांगलीच खरडपट्टी काढली. तर दुसऱ्या आठवड्यात जान्हवी किल्लेकरला सुनावलं. दोघींची शाळा घेण्यामागे एकच कारण ते म्हणजे त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री आणि सध्या बिग बॉसमध्ये सहभागी असलेल्या वर्षा उसगांवकर यांचा आदर केला नाही. या आठवड्यात जान्हवीने वर्षा उसगावंकर यांच्या अभिनयावर आणि त्यांना मिळालेल्या पुरस्कारावर भाष्य केलं. हे बोलताना तिची जीभ घसरली. यानंतर रितेशने तिला चांगलंच सुनावलं. आता नुकतंच समोर आलेल्या प्रोमोत जान्हवी (Janhavi Killekar) चक्कर येऊन पडली आहे.

कलर्स मराठीने बिग बॉसचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश जान्हवीची पोलखोल करतो. तो म्हणतो, ' जान्हवी, नीट ऐका. मी जे बोलतो ते खरं बोलतोय. तुम्ही सोफ्यावर बसून रडत होतात आणि असं म्हणालात की हे सगळं आपण प्लॅनिंग करतोय पण याचं क्रेडिट निक्की घेऊन जातीये'. हे ऐकताच सगळे शॉक होतात. नंतर जान्हवी अक्षरश: हुंदके देऊन रडताना दिसते. तिला श्वास घेणंही कठीण होतंय. अचानक तिला भोवळ येते. अरबाज आणि DP तिला उलचून कन्फेशन रुममध्ये घेऊन जातात. जान्हवी बेशुद्धावस्थेत दिसते. हा प्रोमो सध्या व्हायरल होतोय.


जान्हवीला नक्की काय झालं? तिची तब्येत कशी आहे हे सगळं आता येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. नेटकऱ्यांनी ही ओव्हरअॅक्टिंग असल्याचं म्हणत टीका केली आहे. चर रितेशच्या भाऊच्या धक्क्याचं कौतुक केलं आहे. 'रितेश भाऊंनी एकही मुद्दा सोडला नाही, कडक' अशी कमेंट एकाने केली आहे.

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Janhvi Killekar got dizzy after Ritesh Deshmukh scolded her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.