वर्षा उसगांवकर यांनी भाजी फेकून देताच निक्कीचा चढला पारा, दोघींमध्ये कडाक्याचं भांडण!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 09:48 AM2024-09-11T09:48:12+5:302024-09-11T09:49:07+5:30
'बिग बॉस' मराठीच्या घरात या आठवड्यातही फुल्ल ऑन राडा पाहायला मिळणार आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस' मराठी (Bigg Boss Marathi) पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासून यंदाच्या सीझनमध्ये सदस्यांचा जोरदार कल्ला पाहायला मिळत आहे. घरातील स्पर्धकांमध्ये दिवसेंदिवस वाद वाढतच चालला आहे. आता आजच्या भागात काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. बिग बॉसच्या घरात मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonket) आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) यांच्यात "तू तू मै मै' झालेलं पाहायला मिळणार आहे.
'बिग बॉस' मराठी एक प्रोमो व्हिडrओ समोर आला आहे. यामध्येमध्ये वर्षा आणि निक्की यांच्यात वाद होत असल्याचं दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात वर्षा उसगावंकर यांनी फेकून दिलेली भाजी निक्की घेऊन येते. निक्की येऊन वर्षाताईंना म्हणते,"येथे या घरात लोकांना अन्न मिळत नाहीये आणि या सरळ भाजी फेकून देत आहेत". त्यावर वर्षा ताई निक्कीला म्हणतात, "मला ती भाजी खराब वाटली". पुढे निक्की "तुम्ही किती घाण स्वभावाच्या आहात ते दिसलंय आता".यावर वर्षा तिला म्हणतात, "उगाच आरडाओरडा करून काहीच सिद्ध होणार नाही". भाजीवरुन दोघींमध्ये भांडण झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय.
यापुर्वीही निक्की आणि वर्षा यांच्यात कडाक्याचं भांडण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 'बिग बॉस' मराठीच्या घरात जसजसा एक-एक दिवस पुढे सरकत आहे, तसंतशी समीकरणं बदलताना दिसत आहेत. , धष्टपुष्ट शरीरयष्टी असलेल्या संग्राम चौगुलेने वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतल्याने खेळात मोठा ट्विस्ट आला आहे. आता बिग बॉसचा खेळ अधिक रंजक होताना दिसत आहे. तर दुसऱ्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीचीही चर्चा होऊ लागली आहे.