Bigg Boss Marathi Season 5: भाऊच्या धक्क्यावर सगळ्यांना बसणार शॉक; वर्षा उसगांवकर म्हणाल्या, 'शेवटची इच्छा विचारा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 08:58 AM2024-09-01T08:58:39+5:302024-09-01T08:59:26+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: कलर्स मराठीने बिग बॉसचा नवीन प्रोमो शेअर केला आहे

Bigg Boss Marathi Season 5 new promo conestants getting current for wrong answers | Bigg Boss Marathi Season 5: भाऊच्या धक्क्यावर सगळ्यांना बसणार शॉक; वर्षा उसगांवकर म्हणाल्या, 'शेवटची इच्छा विचारा'

Bigg Boss Marathi Season 5: भाऊच्या धक्क्यावर सगळ्यांना बसणार शॉक; वर्षा उसगांवकर म्हणाल्या, 'शेवटची इच्छा विचारा'

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठी सीझन पाच सुरु होऊन ३० दिवस उलटून गेले आहेत. महिन्याभरात घरातील सदस्यांनी एकमेकांता आता चांगलंच ओळखलं आहे. आज भाऊच्या धक्क्यावर सदस्यांची हीच परीक्षा पाहायला मिळणार आहे. कोण कोणाला किती ओळखतं हे समोर येणार आहे. तसंच चुकीचं उत्तर दिलं तर शॉकही लागणार आहे. रितेश देशमुखने तर सगळ्यांची चांगलीच मजा घेतल्याचं नवीन प्रोमोमध्ये दिसत आहे.

कलर्स मराठीने बिग बॉसचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. काल भाऊच्या धक्क्यावर रितेशने सर्वच सदस्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. टास्कवरुन, गेमवरुन त्यांना सुनावलं. तर काही जणांचं कौतुकही केलं. आज सदस्यांना एक धक्काही मिळणार आहे. दरम्यान सदस्यांसोबत थोटी मस्ती करण्यात आली आहे. प्रोमोमध्ये रितेश सदस्यांना काही प्रश्न विचारत असून माणसं ओळखायला चुकलात तर शॉक बसतो असं तो त्यांना म्हणतो. जे चुकीचं उत्तर देतील त्यांना शॉक दिला जात आहे. 'सूरज झापुक झपूक हा डायलॉग दिवसातून किती वेळा म्हणतो?','निक्की दिवसातून किती वेळा लिपस्टीक लावते?' 


या सगळ्यानंतर वर्षा उसगांवकर म्हणतात, 'मला माझी शेवटची अच्छा विचारा'. हे ऐकून रितेशलाही खूप हसू येतं. हा प्रोमो सध्या तुफान व्हायरल होत आहे. आज भाऊच्या धक्क्यावर एकंदर मजा येणार आहे. शिवाय अंकिता, वर्षा, निक्की आणि अभिजीत हे सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले होते. यांच्यातलं आज कोण बाहेर जातं की काही ट्विस्ट येतो हेही पाहायला मिळणार आहे.

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 new promo conestants getting current for wrong answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.