निक्कीनं 'पाण्यात' लावली 'आग', " ढगाला लागली कळं..."वर पॅडीची धमाल! VIDEO एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:04 AM2024-09-06T11:04:09+5:302024-09-06T11:05:06+5:30
'बिग बॉस मराठी' च्या घरातील काही व्हिडीओ समोर आले आहे. ज्यामध्ये सदस्य हे भिजताना पाहायला मिळतायं.
Bigg Boss Marathi Season 5 : सध्या सुंपर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र नैसर्गिक सौंदर्याने नटला आहे. अनेक ठिकाणं हिरवाईने बहरली आहेत. प्रत्येक जण या ऋतूचा आनंद घेतोय. पावसात मनसोक्त भिजतोय. पण, हा आनंद 'बिग बॉस मराठी'च्या घरात सहभागी झालेले सदस्य घेऊ शकत नव्हते. त्यामुळे खास 'बिग बॉस'च्या घरात सदस्यांसाठी पाऊस पाडण्यात आला आहे.
'बिग बॉस मराठी' च्या घरातील काही व्हिडीओ समोर आले आहे. ज्यामध्ये सदस्य हे भिजताना पाहायला मिळतायं. प्रत्येकाने एका-एका गाण्यावर डान्स केला. निक्कीने "टिप टिप बरसा पानी" गाण्यावर डान्स करत सर्वांना आपल्या अदांनी घायळ केलं. तर निक्कीला डान्स करताना पाहून अरबाज तिच्याकडे पाहताच राहिला. तर पंढरीनाथ कांबळे यांनीही "ढगाला लागली कळ... पाणी थेंब थेंब गळं..." या गाण्यावर धमाल डान्स केला. यावेळी जमीनीवर लोळून लोळून त्यांनी डान्सचा आनंद घेतल्याचं दिसून आलं.
दरम्यान, नुकतंच 'बिग बॉस'मराठीच्या घरात कॅप्टनसी टास्क पार पडला. यावेळी 'कलर्स मराठी' वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोनुसार घराचा नवा कॅप्टन ‘गुलीगत’ फेम सूरज चव्हाण झाला आहे. सूरज कॅप्टन झाल्याने घरातल्या सदस्यांसह नेटकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. एवढंच नव्हे तर सर्व सदस्यांनी मिळून सूरजबरोबर ‘झापुक झुपूक’ बोलत डान्स देखील केला. आता सूरज हे घर शांत ठेवण्यात यशस्वी होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.