निक्कीला दादागिरी भोवली! रितेश भाऊनं दिली मोठी शिक्षा; म्हणाला-"कधीच कॅप्टन होऊ शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 09:40 AM2024-09-07T09:40:35+5:302024-09-07T09:41:12+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : गणपती स्पेशल भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्कीच्या कारनाम्यावर खडेबोल लगावताना दिसणार आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्कीला मोडलेल्या स्टुलवर बसवत तिला तिची जागा दाखवून देणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : Nikki Tamboli got bullied! Riteish Deshmukh Bhau gave big punishment; Said- "Can never be a captain" | निक्कीला दादागिरी भोवली! रितेश भाऊनं दिली मोठी शिक्षा; म्हणाला-"कधीच कॅप्टन होऊ शकत नाही"

निक्कीला दादागिरी भोवली! रितेश भाऊनं दिली मोठी शिक्षा; म्हणाला-"कधीच कॅप्टन होऊ शकत नाही"

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन ( Bigg Boss Marathi Season 5) दिवसेंदिवस मनोरंजक होत चालला आहे. प्रेक्षकांचा यंदाच्या सीझनला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या आठवड्यात काही सदस्यांचं वागणं पाहून प्रेक्षक नाराज झाले होते. त्यांना काही गोष्टींचा राग आला होता. आज भाऊच्या धक्क्यावर रितेश (Riteish Deshmukh) भाऊ या सर्व गोष्टींवर बोलताना दिसणार आहे. गणपती स्पेशल भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्की(Nikki Tamboli)च्या कारनाम्यावर खडेबोल लगावताना दिसणार आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्कीला मोडलेल्या स्टुलवर बसवत तिला तिची जागा दाखवून देणार आहे.

रितेश भाऊ निक्कीला म्हणाला की,"या आठवड्यात निक्कीने विनाकारण घर डोक्यावर घेतले आहे. प्रत्येक सदस्याला त्रास दिला आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या ११ कोटीपेक्षा जास्त प्रेक्षकांना त्रास दिलाय. असे सगळे करुन लोकांचे मनोरंजन होते असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. निक्की तुम्हाला बिग बॉसची आणि प्रेक्षकांची किंमत नाही. घरातील सदस्यांची तुम्ही किंमत ठेवत नाही. बिग बॉसचे नियम वेगळे आणि तुमचे वेगळे आहेत. तुम्ही स्वत;ला क्वीन मानता...पण या आठवड्यात तुम्ही सर्वांची झोकून माफी मागायला पाहिजे".


रितेश भाऊ पुढे म्हणाला की,"निक्की तुम्हाला कॅप्टन म्हणून मिरवायला आवडते. तुम्हाला जी कॅप्टन रूम आवडते ना त्यामुळे इथून पुढे संपूर्ण सीझनभर तुम्ही कधीही कॅप्टन होणार नाही. मी तुमच्या कॅप्टनसीसोबत तुमची इम्युनिटीपण काढून घेत आहे. आठवडाभर घरातील सर्व भांडी तुम्ही एकटीने घासायची आहेत. तुम्ही जर भांडी घासली नाही तर बिग बॉस पुढच्या आठवड्यात थेट नॉमिनेट करतील. अशाप्रकारची दादागिरी मी खपवून घेणार नाही. कारण हे माझं घर आहे". 
 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 : Nikki Tamboli got bullied! Riteish Deshmukh Bhau gave big punishment; Said- "Can never be a captain"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.