Nikki Tamboli : दोस्त दोस्त ना रहा! "...ट्रॉफीच उचलू देणार नाही"; ग्रुप A फुटला, निक्कीने दिलं ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:42 PM2024-08-26T12:42:07+5:302024-08-26T12:49:55+5:30

Bigg Boss Marathi Season 5 And Nikki Tamboli : भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीसमोर टीम A ची पोलखोल केली. ग्रुप A मधील सदस्य निक्कीच्या मागे तिला नेमकं काय म्हणतात याच्या काही क्लिप्स निक्कीला चक्रव्यूहमध्ये दाखवण्यात आल्या. हे पाहून निक्कीला धक्काच बसला. 

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli open challenge to Group A | Nikki Tamboli : दोस्त दोस्त ना रहा! "...ट्रॉफीच उचलू देणार नाही"; ग्रुप A फुटला, निक्कीने दिलं ओपन चॅलेंज

Nikki Tamboli : दोस्त दोस्त ना रहा! "...ट्रॉफीच उचलू देणार नाही"; ग्रुप A फुटला, निक्कीने दिलं ओपन चॅलेंज

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये धमाल पाहायला मिळत आहे. जसजसे दिवस पुढे जात आहेत, तसतसे स्पर्धकांचे खरे चेहरे समोर येत आहेत. घरातील समीकरणं देखील बदलताना दिसत आहेत. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरामध्ये दोन ग्रुप झाले होते. निक्की तांबोळी, अरबाज पटेल यांचा ग्रुप A आहे. तर अंकिता प्रभू-वालावलकर आणि अभिजीत सावंत यांचा ग्रुप B आहे. यामध्ये घरातील इतरही स्पर्धक आहेत. 

अभिनेता रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर जान्हवी किल्लेकरला खडेबोल सुनावले. तसेच जान्हवीला पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्याबद्दल एक आठवडा जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. यासोबतच भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीसमोर टीम A ची पोलखोल केली. ग्रुप A मधील सदस्य निक्कीच्या मागे तिला नेमकं काय म्हणतात याच्या काही क्लिप्स निक्कीला चक्रव्यूहमध्ये दाखवण्यात आल्या. हे पाहून निक्कीला धक्काच बसला. 


आपल्याच ग्रुपमधील सदस्य आपल्याला पाठीमागे असं म्हणतात हे समजल्यावर निक्की चांगलीच संतापली. चक्रव्यूहमधून बाहेर आल्यावर तिने आपला राग व्यक्त करत थेट आपल्याच मित्रांना ओपन चॅलेंज दिलं आहे. "ग्रुप A साठी स्लो क्लॅप, ग्रुप A  फेक आहे. त्यांच्या बोलण्यात दम तर नाहीच आहे, हे हलके लोकं आहेत... माझा वादा आहे की मी ग्रुप A मधील लोकांना ट्रॉफीच उचलू देणार नाही" असं निक्कीने म्हटलं आहे. 

जेलमध्ये टाकल्यानंतर जान्हवीचे रंगच बदलले

बिग बॉस मराठीच्या घरातील नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये जान्हवी निक्की तांबोळीविरोधात लढणार असल्याचं म्हणताना दिसत आहे. या व्हिडिओत गार्डन एरियामध्ये जान्हवीबरोबर आर्या बोलत असल्याचं दिसत आहे. आर्या जान्हवीला म्हणते, "मी अरबाजला हे बोलले की आता तुझा निक्कीबरोबर न खेळण्याचा निर्णय झाला आहे. जो तुझा काल परवापर्यंत झाला नव्हता. आता तुझी खरी पर्सनालिटी दिसून येईल". त्यावर जान्हवी आर्याला म्हणते, "माझा गेम एकदम क्लिअर होता. मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी निक्कीच्या विरोधात कचाकचा भांडू शकते". 
 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli open challenge to Group A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.