Pandharinath Kamble : "ओव्हरअ‍ॅक्टिंग शब्द तुझ्या तोंडून निघणं हास्यास्पद"; पॅडीच्या लेकीने जान्हवीला सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 10:06 AM2024-08-22T10:06:32+5:302024-08-22T10:15:02+5:30

Bigg Boss Marathi Season 5 And Pandharinath Kamble : लाडक्या बाबासाठी पॅडीच्या लेकीने खास पोस्ट केली. ग्रिष्मा कांबळेने इन्स्टा अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत जान्हवीला चांगलेच खडेबोल सुनावले.

Bigg Boss Marathi Season 5 Pandharinath Kamble daughter Grishma Kamble slams Jahnavi Killekar | Pandharinath Kamble : "ओव्हरअ‍ॅक्टिंग शब्द तुझ्या तोंडून निघणं हास्यास्पद"; पॅडीच्या लेकीने जान्हवीला सुनावले खडेबोल

Pandharinath Kamble : "ओव्हरअ‍ॅक्टिंग शब्द तुझ्या तोंडून निघणं हास्यास्पद"; पॅडीच्या लेकीने जान्हवीला सुनावले खडेबोल

Bigg Boss Marathi Season 5 And Pandharinath Kamble : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन हा फक्त वाद आणि भांडणांमुळे गाजत आहेत. घरात दोन ग्रुप झाले असून त्यांच्यात नेहमीच कडाक्याची भांडण होत असलेली पाहायला मिळतात. याच दरम्यान जान्हवी किल्लेकरने वर्षा उसगावकर यांच्यानंतर आता पंढरीनाथ कांबळेचा अपमान केला आहे. आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करत आहे असं म्हणत त्याच्या अभिनयाची खिल्ली उडवली. तिच्या विधानानंतर मराठी सिनेसृष्टीतील सर्वच कलाकारांना आपला राग अनावर झाला आहे. 

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कलाकार आपला राग व्यक्त करत जान्हवीच्या विधानाचा निषेध करत आहेत. अशातच आपल्या लाडक्या बाबासाठी पॅडीच्या लेकीने एक खास पोस्ट केली आहे. ग्रिष्मा कांबळेने आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत जान्हवीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. "ओव्हरअ‍ॅक्टिंग शब्द तुझ्या तोंडून निघणं हास्यास्पद आहे. संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाट्टेल ते बोलणारी तू निक्की तांबोळीची सावलीच आहेस" असं म्हटलं आहे. 

"प्रिय "अभिनेत्री" जान्हवी किल्लेकर... जितकं स्पष्ट तू स्वतःचं नाव उच्चारत नसशील तितकं स्पष्ट आणि आदराने बाबा तुझं नाव घेतो. मुखावाटे बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, महत्त्व, वजन आणि टायमिंग या गोष्टींची समज आणि भान पंढरीनाथ कांबळेला आहे हे त्याने सिद्ध केलं आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा न ओलांडता अगदी संयमाने योग्य असं उत्तर दिलं."

"खरतर "overacting" हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे. हे बघ साधी गोष्ट आहे, contestents च्या घरात सुरू असलेल्या गेम बद्दल तू हवं तेवढा बोलू शकतेस पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी especially वर्षा उसगावकर आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या career वर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमवावी लागेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनही जिंकावी लागतील. कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही."

"मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबाचा स्वभाव नाही. तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची, गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे. संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाट्टेल ते बोलणारी तू निक्की तांबोळीची सावलीच आहेस."

"जेव्हा गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही.... आज तू गेम बाहेरच्या, बाबाने लेकरा सारखाच वाढवलेल्या, फुलवलेल्या career विषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं !! हा तुझा "Fair Game" संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव. त्याच्या संस्कारात वाढली आहे मी, त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते. माझा हेतू फक्त त्याची लेक म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढाच आहे" असं ग्रिष्माने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Pandharinath Kamble daughter Grishma Kamble slams Jahnavi Killekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.