परदेसी गर्ल आणि रांगड्या गडीचा रोमान्स, ग्रँड फिनालेच्या मंचावर इरिना-वैभवचा धमाकेदार डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 10:02 AM2024-10-06T10:02:51+5:302024-10-06T10:03:47+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या ग्रॅण्ड फिनालेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज या मंचावर इरिना आणि वैभव धमाकेदार डान्सचा जलवा दाखवताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi Season 5 : Pardesi Girl and Rangda Gadi's Romance, Irina-Vaibhav's Sizzling Dance on Grand Finale Stage | परदेसी गर्ल आणि रांगड्या गडीचा रोमान्स, ग्रँड फिनालेच्या मंचावर इरिना-वैभवचा धमाकेदार डान्स

परदेसी गर्ल आणि रांगड्या गडीचा रोमान्स, ग्रँड फिनालेच्या मंचावर इरिना-वैभवचा धमाकेदार डान्स

Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'च्या ग्रॅण्ड फिनालेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज या मंचावर यंदाच्या सीझनमधील टॉप ६ स्पर्धक आणि घराबाहेर पडलेले सदस्य थिरकताना दिसणार आहेत. यात इरिना रूडाकोवा (Irina Rudakova) आणि वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) धमाकेदार डान्सचा जलवा दाखवताना दिसणार आहेत. त्यांच्या या डान्सची झलक नुकतीच सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. आज या शोचा ग्रॅण्ड फिनाले पार पडणार आहे. ग्रॅण्ड फिनालेमध्ये परदेसी गर्ल इरिना रुडाकोवा आणि बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाणचा रोमँटिक डान्स पाहायला मिळणार आहे. अत्यंत सुंदर आणि रोमँटिक स्टेप्सने हा परफॉर्मन्स खुलून आला आहे. घरातील दोघांची मैत्री, केमेस्ट्री डान्समध्ये देखील दिसून येत आहे. 


बिग बॉस मराठीच्या इतिहासात ब्लॉकबस्टर ठरलेल्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या भव्यदिव्य ग्रँड सोहळ्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेला आज सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांना हा शो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर आणि जिओ सिनेमावर विनामूल्य पाहता येईल.

 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 : Pardesi Girl and Rangda Gadi's Romance, Irina-Vaibhav's Sizzling Dance on Grand Finale Stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.