"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 02:08 PM2024-09-28T14:08:14+5:302024-09-28T14:09:16+5:30
Bigg Boss Marathi Season 5 Rashichakrakar Sharad Upadhye : बिग बॉसच्या घरात राशीचक्रकार शरद उपाध्ये गेले आहेत. याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये शरद उपाध्ये यांना घरातील सदस्य मजेशीर प्रश्न विचारताना दिसत आहेत.
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन हा ७० दिवसांचा आहे. त्यामुळे महाअंतिम सोहळ्याला आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. फॅमिली वीकमध्ये घरातील सदस्य आपल्या कुटुंबीयांना भेटले. हा प्रत्येकासाठीच खूप भावुक करणारा क्षण होता. कुटुंबीय भेटल्याने घरातील सदस्यांना आता आणखी एनर्जी मिळाली आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले यांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
बिग बॉसच्या घरात राशीचक्रकार शरद उपाध्ये गेले आहेत. याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये शरद उपाध्ये यांना घरातील सदस्य मजेशीर प्रश्न विचारताना दिसत आहेत. Extra कल्ला म्हणजे Extra ड्रामा, Extra धमाल असं म्हणत कलर्स मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस सुरुवातीला शरद उपाध्ये यांचं स्वागत करत आहेत. त्यानंतर पॅडी त्यांना प्रश्न विचारतो की, "सूरज यांचं लग्न ठरत नाही आहे. नेमका कधी योग आहे लग्नाचा?"
शरद उपाध्ये यावर भन्नाट उत्तर देतात. ते म्हणतात की, मी मुलगी असतो तर यांना सोडलं नसतं. या उत्तरावर सर्व सदस्य जोरजोराने हसायला लागतात. त्यानंतर पॅडी आणखी एक प्रश्न विचारतो, फायनलपर्यंत कोणती रास जाईल? त्यावर उपाध्ये म्हणतात, "बिग बॉस मला केव्हातरी आपली रासही जाणून घ्यायची आहे." शरद उपाध्ये यांच्याबरोबर रंगलेला हा भाग आणि आतापर्यंत न पाहिलेले क्षण, ‘आठवड्याचा Extra कल्ला’ उद्या दुपारी 1 वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
सूरज चव्हाणने वरातीमधला गमतीदार किस्सा सांगितला आहे. सूरज पॅडी दादांना म्हणतो, "गावात वरात असते, डीजेची वरात असते, नवरा घोड्यावर बसतो आणि घोडा नाचतो. घोड्याचे पाय वर जातात. एकदा काय झालं, घोड्याने पाय वर केले आणि पलटीच झाला. माणसाच्या अंगावर पडला... माणूस दबला गेला. त्या माणसाला खूप लागलं होतं. लग्न सुरू होतं. लग्नात घोडा नवऱ्याला घेऊन नाचत होता आणि मध्येच घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला. नवरा आणि घोडा परत आलाच नाही. नवरा एकीकडे पडलेला सापडला." त्यावर पॅडी दादांनी "तुझ्याच गावाकडे कसे असे किस्से" असं म्हटलं आहे.