Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 06:25 PM2024-10-06T18:25:02+5:302024-10-06T18:27:47+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: दोन आठवडे भाऊचा धक्का का होऊ शकला नाही? रितेश म्हणाला...

Bigg Boss Marathi Season 5 Riteish deshmukh reveals why he was absent for 2 weeks | Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण

Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण

बिग बॉस मराठी सीझन ५ (Bigg Boss Marathi Season 5)  च्या ग्रँड फिनाले ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. दोन आठवड्यांनंतर रितेश देशमुखला (Riteish Deshmukh) स्टेजवर पाहून प्रेक्षक खूश झाले. दोन आठवडे भाऊचा धक्का न झाल्याने प्रेक्षक नाराज होते. रितेश आज थेट फिनालेला सर्वांसमोर आला आहे. स्टेजवर येताच रितेशने सर्वप्रथम प्रेक्षकांची माफी मागत गैरहजेरीचं कारण स्पष्ट केलं आहे. काय म्हणाला रितेश?

बिग बॉस मराठी सीझन ५ ला २८ जुलै रोजी सुरुवात झाली होती. रितेश देशमुखने त्याच्या लय भारी स्टाईलने होस्टिंग केली.  हा सीझन १०० नाही तर ७० दिवस चालला. आज ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले होत आहे. गेले दोन आठवडे रितेशच्या गैरहजेरीने भाऊचा धक्का झाला नाही. याचं कारण रितेशने स्पष्ट केलं. तो म्हणाला, " एक वर्षापूर्वीच मी सिनेमाच्या टीमला कमिटमेंट दिली होती. ५ आठवड्यांची ही कमिटमेंट होती. तरी पण ३ आठवडे बिग बॉसने अॅडजस्ट केलं. मी दोन आठवडे युरोपमध्ये शूटसाठी गेलो होतो. शूट क्रुझवर असल्याने रद्द करणंही शक्य नव्हतं. म्हणून मला हजर राहता आलं नाही. यासाठी मी प्रेक्षकांची माफी मागतो."


बिग बॉस मराठी सीझन ५ च्या फिनालेपर्यंत अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर हे सदस्य पोहोचले आहेत. यातले कोण टॉप पर्यंत जाणार याचीच उत्सुकता आहे. आता काही वेळातच बिग बॉस मराठी सीझन ५ चा विजेता घोषित होणार आहे.

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Riteish deshmukh reveals why he was absent for 2 weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.