रितेश भाऊ सदस्याची करणार चांगलीच कानउघडणी, सगळ्यांचाच हिशोब करणार चुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 13:21 IST2024-08-31T13:20:54+5:302024-08-31T13:21:28+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सदस्यांची शाळा घेण्यासाठी सज्ज आहे.

रितेश भाऊ सदस्याची करणार चांगलीच कानउघडणी, सगळ्यांचाच हिशोब करणार चुकता
'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi Season 5) हा पाचवा आठवडा चांगलाच गाजला. गेल्या आठवड्यात रितेश भाऊंनी चक्रव्युह दाखवल्यानंतर काही नात्यांची चक्र गरागर फिरली. जोड्यांच्या बेडीत सदस्य बांधले गेले. काही जोड्या चांगल्या गाजल्या. या आठवड्यात सदस्यांना एक धक्का मिळाला. घरात एक रहस्यमय पाहुणा अवतरला. सोन्याची नाणी मिळवताना सदस्यांचा गेम झाला. आता आज भाऊच्या धक्क्यावर सदस्यांची शाळा घेण्यासाठी सज्ज आहे.
'भाऊच्या धक्क्या'वर रितेश भाऊ आज सदस्यांची चांगलीच कानउघडणी करणार आहे. प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय,"बिग बॉस मराठी'च्या घराला भूताने झपाटलं... काहींच्या अंगात जिंकण्याचं वारं भरलं..याच नादात सगळ्यांचं काहीतरी चुकलं. सगळ्यांचाच हिशोब करुयात चुकता.. बघा भाऊचा धक्का न चुकता".
बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात सदस्यांना त्यांच्याच मित्रांचे खरे चेहरे दिसले आहेत. आता सदस्यांची खेळण्याची पुढची चाल काय असेल याकडे सर्वांचचं लक्ष लागलं आहे. तसेच आजचा भाऊचा धक्काही खास असणार आहे.
वर्षा उसगांवकर घराच्या नवीन कॅप्टन
दिवसेंदिवस घरातला खेळ रंगत चालला आहे. पहिल्या आठवड्यात घराची कॅप्टन अंकिता वालावलकर होती. त्यानंतर अरबाज पटेल कॅप्टन झाला. त्याला कॅप्टन्सी मिळाल्यानंतर दोन दिवसात गेम पलटला आणि कॅप्टन्सी निक्की तांबोळीला मिळाली. खरेतर अरबाजने तिला गिफ्ट दिले. त्यानंतर आता घराला चौथा कॅप्टन मिळाला आहे. या आठवड्यात वर्षा उसगांवकर घराच्या नवीन कॅप्टन आहेत.