"ज्यासाठी घरात गेलो होतो ते काम झालं", अरबाजच्या एलिमिनेशननंतर संग्राम चौगुलेने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 01:24 PM2024-09-23T13:24:39+5:302024-09-23T13:25:07+5:30

अरबाज घराबाहेर गेल्यानंतर संग्राम चौगुलेची पहिली प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi Season 5 Sangram Chougule shared video after Arbaz Patel eliminated | "ज्यासाठी घरात गेलो होतो ते काम झालं", अरबाजच्या एलिमिनेशननंतर संग्राम चौगुलेने शेअर केला व्हिडिओ

"ज्यासाठी घरात गेलो होतो ते काम झालं", अरबाजच्या एलिमिनेशननंतर संग्राम चौगुलेने शेअर केला व्हिडिओ

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉसच्या पाचव्या पर्वाला सुरु होऊन ५० दिवस उलटले आहेत. दरम्यान कालच्या एपिसोडमध्ये अरबाज पटेलला कमी मतं मिळाल्याने तो घराबाहेर गेला. अरबाज घरात शारिरीकदृष्ट्या अतिशय स्ट्राँग स्पर्धक होता. त्याला टक्कर देण्यासाठी कोल्हापूरचा बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने (Sangram Chougule) घरात एन्ट्री घेतली होती. मात्र दुखापतीच्या कारणामुळे त्याला घराबाहेर जावं लागलं. आता अरबाजच्या एलिमिनेशनवर संग्रामने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

'अरबाज तू कमजोर लोकांसमोर गेम दाखवतोस, आता माझ्यासमोर दाखव' असं म्हणत संग्राम चौगुलेने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. मात्र घ़डलं उलटंच. अरबाज संग्रामवरही भारी पडला. इतकंच नाही तर एका टास्कमध्ये संग्रामला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा हात फ्रॅक्चर झाला. या कारणामुळे तो शनिवारी घराबाहेर गेला. संग्रामला घराबाहेर आल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील रुममध्ये संग्रामने बिग बॉसचा कालचा एपिसोड पाहिला. अरबाज बाहेर गेल्याचं पाहताच संग्रामने व्हिडिओ शेअर करत लिहिले, "मी तर बिग बॉसच्या घरातून बाहेर आलो पण ज्यासाठी मी त्या घरात आलेलो ते काम तर झालं. त्यानी त्याच्या individual गेम वर जास्त focus नाही केलं म्हणून काल त्याचं elimination झालं. Karma will take care of your deeds."


संग्रामच्या या व्हिडिओवर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देत त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसंच तो तुमच्यामुळे नाही तर आम्हा प्रेक्षकांमुळेच गेल्याचंही अनेकांनी कमेंट केली आहे. अरबाज गेल्यानंतर आता घरातील समीकरणं कशी बदलतात, निक्कीची काय  अवस्था होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

दरम्यान यंदाचा बिग बॉसचा सीझन हा १०० नव्हे तर ७० च दिवसांचा असणार आहे अशी एक चर्चा सुरु आहे. आज बिग बॉस मोठी घोषणा करणार आहेत असा प्रोमोही आला आहे. ही तीच घोषणा असल्याचा प्रेक्षकांचा अंदाज आहे. 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Sangram Chougule shared video after Arbaz Patel eliminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.