'बिग बॉस'च्या घरात 'या' आठवड्यात एकूण ७ सदस्य झाले नॉमिनेट! कुणाचा खेळ संपणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 09:16 AM2024-09-03T09:16:15+5:302024-09-03T09:16:38+5:30

'बिग बॉस'च्या घरात या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

Bigg Boss Marathi Season 5 seven contestants are nominated in this week | 'बिग बॉस'च्या घरात 'या' आठवड्यात एकूण ७ सदस्य झाले नॉमिनेट! कुणाचा खेळ संपणार?

'बिग बॉस'च्या घरात 'या' आठवड्यात एकूण ७ सदस्य झाले नॉमिनेट! कुणाचा खेळ संपणार?

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाला जोरदार सुरुवात झाली आहे. २८ जुलैपासून सुरू झालेलं 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. आता 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा सुरू झाला आहे.  नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात नॉमिनेश टास्क पार पडला. यावेळी एक दोन नाही तर तब्बल ७  सदस्य हे नॉमिनेट झाले आहेत. 

'बिग बॉस'च्या घरात या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये 'तुमच्या मते या खेळात असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या सदस्यांना नॉमिनेट करा', असे निकष घालून देण्यात आले होते. यानुसार प्रत्येकाने येऊन आपली मतं नोंदवली आणि घरात नको असणाऱ्या दोन सदस्यांचे फोटो फाडले आणि कचरापेटीत टाकले. यात सर्वाधिक फोटो फाडलेल्या सात सदस्यांच्या नावाची नॉमिनेटेड स्पर्धक म्हणून घोषणा करण्यात आली आहे. ते स्पर्धक म्हणजे घनश्याम दरोडे ( Ghanshyam Darode), आर्या जाधव (Arya Jadhav), सूरज चव्हाण (Suraj Chavan), धनंजय पोवार (Dhananjay Powar), निक्की तांबोळी (Nikki Tamboli), अरबाज पटेल (Arbaaz Patel) आणि अभिजीत सावंत (Abhijit Sawant). एकदाच 7 सदस्य नॉमिनेट झाल्याचे पाहून सर्वंच प्रेक्षकांना धक्का बसलाय.


'बिग बॉस मराठी'च्या घरातील हा सहावा आठवडा सदस्यांची झोप उडणार असल्याचे संकेत भाऊचा धक्क्यावर शोचा होस्ट रितेश देशमुख याने दिलेत. त्यामुळे हा आठवडा घरातील सदस्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. सहाव्या आठवड्यात घराच्या कॅप्टन  वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) घराच्या नवीन कॅप्टन आहेत. त्यामुळे आता नॉमिनेशन टास्कमध्ये त्या सुरक्षित आहेत.

दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या घरातून आतापर्यंत पुरुषोत्तम पाटील, योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे सदस्य बाहेर पडले आहेत. आता या आठवड्यात प्रेक्षक कुणाला वाचवतात हे येत्या विकेंडलाच कळेलं. 'बिग बॉस मराठी' हा शो दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होतो. तसेच तुम्ही जिओ सिनेमावरही हा शो पाहू शकता.
 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 seven contestants are nominated in this week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.