Bigg Boss Marathi 5 : "मग सड लसूणमध्ये...", निक्की तांबोळी अरबाजवर भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 12:29 PM2024-08-09T12:29:00+5:302024-08-09T12:30:02+5:30

Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांनी नॉमिनेशन टास्कदरम्यान आवश्यक किराणा सामान विकत घेतला. या टास्कदरम्यान पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निक्की आणि घन:श्याम हे घरातील सदस्य नॉमिनेट झाले. नॉमिनेट झाल्याने निक्कीचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला.

Bigg Boss Marathi Season 5 : "So in rotten garlic...", Nikki fumes at Arbaaz | Bigg Boss Marathi 5 : "मग सड लसूणमध्ये...", निक्की तांबोळी अरबाजवर भडकली

Bigg Boss Marathi 5 : "मग सड लसूणमध्ये...", निक्की तांबोळी अरबाजवर भडकली

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. आज घरातला तेरावा दिवस आहे. घरात पहिल्या दिवसापासून वाद, भांडणं, रुसवेफुगवे पाहायला मिळत आहेत. एकीकडे निक्की तांबोळी  (Nikki Tamboli) आणि अरबाज यांच्यात प्रेम फुलत असताना आता त्यांच्यात वाद झाले आहेत. निक्की त्याच्यावर चांगलीच संतापली आहे. 
 
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांनी नॉमिनेशन टास्कदरम्यान आवश्यक किराणा सामान विकत घेतला. या टास्कदरम्यान पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निक्की आणि घन:श्याम हे घरातील सदस्य नॉमिनेट झाले. नॉमिनेट झाल्याने निक्कीचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला. आता लसणाच्या ठेच्यासारखा निक्कीचा राग अरबाज पचवू शकेल का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 


'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाजमुळे निक्की प्रचंड दुखावलेली दिसत आहे. वैभव आणि जान्हवी निक्कीला समजावत दिसत आहे. त्यावर निक्की म्हणाली की, तो मला सगळ्यांसमोर हेच म्हणाला की मी लसूणची निवड केली. मग त्याला सांग सड लसूणमध्ये. त्यानंतर अरबाज बोलताना दिसतो की, आमच्याकडे खूप मोठा मुद्दा होता की, तिकडे लसूण होते. त्यावर निक्की म्हणते, माझ्यापेक्षा लसूण महत्त्वाचे होते का?  दरम्यान "तुला वाचवण्यासाठीच अरबाज प्रयत्न करत होता", असं वैभव निक्कीला म्हणत आहे. मग निकी म्हणाली की, "गेलं खड्ड्यात...एवढं प्रेम दाखवूनदेखील मी नॉमिनेट झाली आहे".

पॅडीने केली अभिजीतची नक्कल
'बिग बॉस मराठी'च्या घरात पॅडीने अभिजीतची नक्कल केली आहे. अभिजीतची नक्कल करत पॅडी म्हणतोय,"हे बघा मित्रांनो.. आपण आज इथे आलो आहोत तर आपल्याला टिकून राहणं खूप गरजेचं आहे. गाणं ऐकूण तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. शक्ती आहे तर आपल्याकडे युक्ती आहे". दरम्यान घरातील इतर सदस्य धमाल करताना दिसत आहेत.

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 : "So in rotten garlic...", Nikki fumes at Arbaaz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.