Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 19:13 IST2024-09-16T19:02:53+5:302024-09-16T19:13:21+5:30
Bigg Boss Marathi Season 5 And Suraj Chavan : बिग बॉसने मैत्रिणीचा विषय काढताच सूरज भरपूर लाजल्याचं पाहायला मिळत आहे.

Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये रोज नवनवीन भन्नाट किस्से पाहायला मिळत आहेत. काल भाऊच्या धक्क्यावर अभिनेता रितेश देशमुखने घरातील सर्वच सदस्यांना एक खास भेट दिली. रितेश स्वत: बिग बॉसच्या घरात गेला आणि त्याने सर्व स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबीयांचा व्हिडीओ दाखवला. जवळपास ५० दिवसांनी कुटुंबीयांना पाहून सर्वच स्पर्धकांना अश्रू अनावर झाले. सर्वच जण भावुक झाले.
'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाण आपल्या साध्या, सरळ वागण्यातून सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. बिग बॉसच्या घरातील कामं तक्रार न करता करत असतो. पण आता बिग बॉसने मैत्रिणीचा विषय काढताच सूरज भरपूर लाजल्याचं पाहायला मिळत आहे. सूरज मी असं ऐकलंय की आपल्याला एक मैत्रीण हवीय. कशी मैत्रीण हवीय सांगा असं बिग बॉसने सूरजला विचारलं. यावर निक्की म्हणते, पोरगा लाजला.
सूरजने देखील बिग बॉसच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. "चांगला स्वभाव पाहिजे, साडी नेसणारी हवी" असं सांगितलं. त्यावर अभिजीत म्हणतो, "अरे मैत्रीण हवीय ना... लग्नाचं प्रपोझल नाही." त्याच वेळी बिग बॉसच्या घरातील फळ्यावर कोणीतरी हार्ट इमोजी काढला असून त्यात S असं लिहिलेलं दिसत आहे. बिग बॉसच्या या नव्या प्रोमोनंतर 'ती' कोण? अशी चर्चा जोरदार रंगली आहे. आणखी एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार असंही म्हटलं जात आहे.
बिग बॉसच्या घरात एका टास्कदरम्यान निक्कीच्या कानशिलात लगावल्यामुळे आर्या जाधवला बिग बॉसने निष्कासित केलं आहे. तसेच वैभव चव्हाण एलिमिनेट झाल्याने त्याला घराबाहेर जावं लागलं. नॉमिनेटेड सदस्यांपैकी वैभवला कमी मतं मिळाल्याने ५० व्या दिवशी वैभवचा खेळ संपला. वैभवच्या नावाची घोषणा होताच सर्वांनाच धक्का बसला. वैभवचा खास मित्र अरबाज पटेलला अश्रू अनावर झाले.