Suraj Chavan : "मी नसतो कोणालाच भीत, मीच आहे गुलीगत टॉपचा किंग"; सूरज चव्हाण आता बेधडक भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 12:27 PM2024-08-01T12:27:27+5:302024-08-01T12:32:24+5:30

Bigg Boss Marathi Season 5 And Suraj Chavan : सूरजने बिग बॉस मराठीचा सीझन ५ जिंकण्याचा निर्धार केला आहे. सूरजने विशेष प्रेक्षकांना विशेष स्टाईलने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. पण आता मात्र तो कोणालाही न घाबरता हटके स्टाईलने सर्वांना गोलीगत चीत करताना दिसून येणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan wants to win new Promo out | Suraj Chavan : "मी नसतो कोणालाच भीत, मीच आहे गुलीगत टॉपचा किंग"; सूरज चव्हाण आता बेधडक भिडणार

Suraj Chavan : "मी नसतो कोणालाच भीत, मीच आहे गुलीगत टॉपचा किंग"; सूरज चव्हाण आता बेधडक भिडणार

Bigg Boss Marathi Season 5 And Suraj Chavan : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन वादामुळे चांगलाच गाजत आहे. गुलीगत फेम सूरज चव्हाणची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याच्या वागण्यामुळे तो सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. याच दरम्यान आता सूरजने बिग बॉस मराठीचा सीझन ५ जिंकण्याचा निर्धार केला आहे. सूरजने विशेष प्रेक्षकांना विशेष स्टाईलने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. पण आता मात्र तो कोणालाही न घाबरता हटके स्टाईलने सर्वांना गोलीगत चीत करताना दिसून येणार आहे.

प्रोमोमध्ये सूरज निक्की तांबोळीला चॅलेंज करताना दिसून येत आहे. त्यावर निक्की तांबोळी सूरजला म्हणते,"तू मला चॅलेंज करतोस ना... तू विचार पण करू शकत नाही की तू माझं असं रुप पाहशील". त्यानंतर कन्फेशन रुममध्ये 'बिग बॉस' सूरजला बोलावतात आणि म्हणतात, "सूरज न घाबरता खेळा". यानंतर सूरजलाही मोठा धीर मिळाला आणि त्याने निर्भीडपणे "मीच आहे आता गुलीगत टॉपचा किंग" असं म्हटलं आहे. 


"आता मी नसतो कोणालाच भीत, मी देतो टिंग, होतो चिंग कारण मीच आहे आता गुलीगत टॉपचा किंग" असं म्हणत सूरजने आपली हटके स्टाईल पुन्हा एकदा दाखवली आहे. गुलीगतचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तू लढ भावा, ज्यांनी केला सूरजचा नाद त्यांना तो करणार गुलीगत बाद, आपला भाऊ गुलीगत, नड तू, अशा कमेंट्स करत सूरजचे चाहते आणि नेटकरी त्याला चांगलेच सपोर्ट करताना दिसत आहेत. 

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, धनंजय पवार, पुरूषोत्तमदादा पाटील हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार हे येत्या वीकेंडला कळेल. यंदाच्या पर्वात एकापेक्षा एक अवली सदस्य सहभागी झाले आहेत.

"बिग बॉस सॉरी, मी..."; 'गुलीगत फेम' सूरजने पहिल्याच दिवशी मागितली माफी

'गुलीगत फेम' सूरज चव्हाणने पहिल्याच दिवशी बिग बॉसची माफी मागितली आहे. ब्रश करायला पाणी घेतलं तर बिग बॉस ओडरणार नाही ना? असा प्रश्न सूरजने वैभवला विचारला. त्यावर वैभवने मी तर पाणी घेतलं कारण ब्रशची गरज होती असं म्हटलं. त्यानंतर कॅमेऱ्यासमोर येऊन सूरजने हात जोडून बिग बॉसची आधी माफी मागितली. "बिग बॉस सॉरी, मी हे एक ग्लास पाणी दात घासायला घेतोय. मला माफ करा यावेळी. परत नाही घेत" असं म्हटलं आहे. 
 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan wants to win new Promo out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.