अभिजीत सावंतला मिळणार गोड सरप्राईज; लेक विचारते, 'मी इथे राहू का?' बिग बॉसचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:20 PM2024-09-26T12:20:33+5:302024-09-26T12:21:05+5:30

Bigg Boss Marathi Season 5: अभिजीतला भेटायला आली पत्नी आणि लाडक्या लेकी

bigg boss marathi season 5 surprise for Abhijeet Sawant as his family visit him in the house | अभिजीत सावंतला मिळणार गोड सरप्राईज; लेक विचारते, 'मी इथे राहू का?' बिग बॉसचं भन्नाट उत्तर

अभिजीत सावंतला मिळणार गोड सरप्राईज; लेक विचारते, 'मी इथे राहू का?' बिग बॉसचं भन्नाट उत्तर

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीचा पाचवा पर्व संपायला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. सध्या घरात आट स्पर्धक राहिले आहेत. त्यांच्यात अनेक टास्क रंगत आहेत. दरम्यान अभिजीत सावंतला (Abhijeet Sawant) एक गोड सरप्राईज मिळणार आहे. बिग बॉसमध्ये फॅमिली वीक सुरु होतोय. अभिजीतची पत्नी आणि त्याच्या दोन्ही मुली त्याला भेटायला घरात आल्या आहेत. याचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाला सुरुवात होऊन आता ६० दिवस होत आलेत. २८ जुलै रोजी बिग बॉस मराठी ५ चा प्रीमिअर झाला. यावेळी बिग बॉस १०० नव्हे तर ७० दिवसातच निरोप घेणार आहे. त्यातही ६० दिवस पूर्ण होत आलेत. नुकतंच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये बिग बॉस सगळ्यांना स्तब्ध व्हायला सांगतात. त्यानंतर दरवाजा उघडतो आणि अभिजीत सावंतची पत्नी आतमध्ये येते. ती अभिजीतला मिठी मारते. दोघांनाही अश्रू अनावर होतात. नंतर अभिजीतच्या दोन्ही क्युट मुली घरात येतात. छोटी म्हणते, 'बिग बॉस मी इकडे राहू शकते का?' यावर बिग बॉस म्हणतात,'चला अजून एक वाईल्ड कार्ड स्पर्धक मिळाला.' यानंतर सगळेच हसतात.


आपल्या कुटुंबाला बघून अभिजीत भावूक होतो. सगळे सदस्य त्याच्या दोन्ही मुलींना घेऊन बसतात आणि गप्पा मारतात, हसतात. आता इतरही सदस्यांना भेटायला त्यांचे कुटुंबीय येणार का  हे पुढे कळेलच. 

६ ऑक्टोबर रोजी बिग बॉसचा ग्रँड फिनाले होणार आहे. वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, पंढरीनाथ कांबळे, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर हे आठ स्पर्धक राहिले आहेत.

Web Title: bigg boss marathi season 5 surprise for Abhijeet Sawant as his family visit him in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.