Suraj Chavan : "बिग बॉस सॉरी, मी..."; 'गुलीगत फेम' सूरज चव्हाणने पहिल्याच दिवशी हात जोडून मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 02:25 PM2024-07-30T14:25:39+5:302024-07-30T14:35:41+5:30

Bigg Boss Marathi Season 5 And Suraj Chavan : 'गुलीगत फेम' सूरज चव्हाणने पहिल्याच दिवशी बिग बॉसची माफी मागितली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 tik tok star Suraj Chavan Apologized for water | Suraj Chavan : "बिग बॉस सॉरी, मी..."; 'गुलीगत फेम' सूरज चव्हाणने पहिल्याच दिवशी हात जोडून मागितली माफी

Suraj Chavan : "बिग बॉस सॉरी, मी..."; 'गुलीगत फेम' सूरज चव्हाणने पहिल्याच दिवशी हात जोडून मागितली माफी

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. रितेश देशमुखचं होस्टिंग आणि १६ स्पर्धकांची घरात एन्ट्री झाली. इन्फ्लुएन्सर्स ते टीव्ही कलाकार, गायक, पुढारी, फिल्म स्टार, फॉरेनर असे वेगवेगळे लोक एका घरात आले आहेत. यंदा बिग बॉसमध्ये काहीच मोफत मिळणार नाही. बेडरुम, किचन, बाथरुम किंवा स्वीमिंग पूल, अगदी पिण्याचं पाणी असो किंवा अन्न... सगळ्यासाठी स्पर्धकांना पैसे द्यावे लागणार आहेत. याची झलक समोर आली. 

पहिल्याच दिवशी स्पर्धकांना अंघोळीला पाणीच नाही. बिग बॉसने त्यांच्या तोंडचं पाणीच पळवलं आहे. आता फक्त घरातलं पाणी गेलंय थोड्याच वेळात सर्वांच्या तोंडचं पाणीही पळणार अशी ताकीदच बिग बॉसने स्पर्धकांना दिली होती. त्यानंतर सर्वच स्पर्धकांना थोडा धक्का बसला आणि घरामध्ये पाण्याविषयी चर्चा सुरू झाली. याच दरम्यान 'गुलीगत फेम' सूरज चव्हाणने पहिल्याच दिवशी बिग बॉसची माफी मागितली आहे.

ब्रश करायला पाणी घेतलं तर बिग बॉस ओडरणार नाही ना? असा प्रश्न सूरजने वैभवला विचारला. त्यावर वैभवने मी तर पाणी घेतलं कारण ब्रशची गरज होती असं म्हटलं. त्यानंतर कॅमेऱ्यासमोर येऊन सूरजने हात जोडून बिग बॉसची आधी माफी मागितली. "बिग बॉस सॉरी, मी हे एक ग्लास पाणी दात घासायला घेतोय. मला माफ करा यावेळी. परत नाही घेत" असं म्हटलं आहे. 

 सूरजने घरातील सदस्यांशी बोलताना तो दिवसाला किती कमाई करतो याचा खुलासा केला आहे. सूरज चव्हाणने घरात योगिता चव्हाण, अभिजीत सावंत आणि घरातील इतर सदस्यांशी संवाद साधला. त्यावेळी सूरज म्हणाला, "मी दिवसाला ८० हजारांची कमाई करायचो." सूरजने सांगितलेला कमाईचा आकडा बघून सर्वच शॉक झाले. अशाप्रकारे सूरज व्हिडीओ आणि यूट्यूबच्या माध्यमातून दिवसाला ८० हजार रुपये कमवायचा. तसेच घरात निर्णय घेण्यास असमर्थ असलेला सदस्य म्हणून घरातील सदस्यांनी सूरजची निवड केली.
 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 tik tok star Suraj Chavan Apologized for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.