Bigg Boss Marathi Season 5: सदस्यांशी गप्पा मारायला येणार दोन डॅशिग कलाकार, आता होणार कल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 01:21 PM2024-08-18T13:21:45+5:302024-08-18T13:23:15+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: त्यांच्या व्हिडिओवर योगिता चव्हाणच्या नवऱ्याचीही कमेंट

Bigg Boss Marathi Season 5 Utkarsh Shinde and Jay Dudhane will chitchat with bigg boss contestants | Bigg Boss Marathi Season 5: सदस्यांशी गप्पा मारायला येणार दोन डॅशिग कलाकार, आता होणार कल्ला!

Bigg Boss Marathi Season 5: सदस्यांशी गप्पा मारायला येणार दोन डॅशिग कलाकार, आता होणार कल्ला!

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठी च्या पाचव्या सीझनचा सध्या तिसरा आठवडा दुसरा आहे. एकंदरच स्पर्धकांमध्ये सुरु असलेल्या भांडणांमुळे धमाल येत आहे. कॅप्टन्सीवरुन सदस्यांमध्ये एकापेक्षा एक टास्क खेळले जात आहेत. तर काही जण घरच्यांच्या आठवणीत हरवले आहेत. निक्की गँगने तर बी टीमच्या नाकात दम आणला आहे. आता या सर्वांशी गप्पा मारायला दोन पाहुणे बिग बॉसमध्ये येऊन सदस्यांना सरप्राईज देणार आहेत. कोण आहेत ते?

बिग बॉस सीझन ५ मध्ये निक्की, अरबाज, जान्हवी, पुढारी या गँगची भाऊच्या धक्क्यावर रितेशने चांगलीच तासली. तर पॅडी, DP, अंकिता या टीम B ला जागं केलं. आता या सर्व सदस्यांशी गप्पा मारायला घरात दोन डॅशिंग कलाकार येत आहेत. ते म्हणजे जय दुधाणे (Jay Dudhane)आणि उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde). हे दोघंही बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी होते. दोघंही सोशल मीडियावर  बिग बॉसबाबतीत पोस्ट करत असतात. आता त्यांनाच  स्पर्धकांशी गप्पा मारायला बोलवण्यात आलं आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


या व्हिडिओवर सध्या बिग बॉसमध्ये असलेली योगिता चव्हाणचा नवरा सौरभनेही कमेंट केली आहे. 'आता खरा कल्ला होणार' असं तो म्हणतोय. तर नेटकऱ्यांनी लिहिले, 'नुसतं गप्पा मारायला नको १ आठवडा त्या घरात जा तुमची गरज आहे' अशा कमेंट्स केल्या आहेत. तर एका नेटकऱ्याने गंमतीत लिहिले, 'कधीकाळी हे दोघेपण टीम A चेच मेंबर होते. मीरा आणि जय मांजरेकरांच्या रडारवरच असायचे. 

बिग बॉसमध्ये आज भाऊच्या धक्क्यावर एक स्पर्धक घराबाहेर होणार आहे. योगिता चव्हाण, निखिल दामले, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण या स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. त्यामुळे आज कोण घराबाहेर जातं याकडे प्रेक्षकांचं  लक्ष लागलं आहे.

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Utkarsh Shinde and Jay Dudhane will chitchat with bigg boss contestants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.