Utkarsh Shinde : "शिक्षण नसूनही कधी भाषेत माज, दुसऱ्यांचा अपमान..."; उत्कर्ष शिंदेचा सूरजला फूल सपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 01:06 PM2024-08-09T13:06:29+5:302024-08-09T13:08:28+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Utkarsh Shinde And Suraj Chavan : कलर्स मराठीने बिग बॉस मराठी सीझन ५ चा आता नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये सूरज चव्हाण घरामध्ये कचरा काढताना दिसत आहे. या प्रोमोवर उत्कर्ष शिंदेने कमेंट केली असून सूरजचं कौतुक केलं आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Utkarsh Shinde full support to Suraj Chavan | Utkarsh Shinde : "शिक्षण नसूनही कधी भाषेत माज, दुसऱ्यांचा अपमान..."; उत्कर्ष शिंदेचा सूरजला फूल सपोर्ट

Utkarsh Shinde : "शिक्षण नसूनही कधी भाषेत माज, दुसऱ्यांचा अपमान..."; उत्कर्ष शिंदेचा सूरजला फूल सपोर्ट

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची जोरदार चर्चा रंगली आहे. स्पर्धकांचे खरे चेहरे आता हळूहळू समोर येत आहेत. सध्या धमाल पाहायला मिळत आहे. अनेक सदस्यांमध्ये टोकाचा वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. अशातच 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाणची हटके स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तसेच सूरज आता कोणालाही न घाबरता आपली मतं काही ठिकाणी मांडताना दिसत आहे. तो घरातील कामं तक्रार न करता करत असतो. 

कलर्स मराठीने बिग बॉस मराठी सीझन ५ चा आता नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये सूरज चव्हाण घरामध्ये कचरा काढताना दिसत आहे. "माणसं समजून घेत, सगळ्यांची काळजी घेत, सुरू आहे सूरजची गेममध्ये वाटचाल" असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या प्रोमोवर लोकप्रिय मराठी गायक उत्कर्ष शिंदेने कमेंट केली असून सूरजचं कौतुक केलं आहे. "एकटा राहतो, एकटा खेळतो, एकटा भिडतो, एकटा नडतो, आणि एकटाच पुढे पण असणार, दिसणार" असं म्हणत उत्कर्षने सूरजला फूल सपोर्ट केला आहे. 

प्रोमोमध्ये सूरज कचरा काढताना दिसतो, त्याला पाहून अंकिता प्रभू वालावलकर म्हणते, "त्याला असं पाहून मला कसंतरी वाटतंय." यावर पंढरीनाथ कांबळे म्हणतो, "तो बिचारा ऐरवीही तेच काम करत असेल बाहेर. तो काल मला म्हणाला, दादा मला खूप वाईट वाटतं मी बेडवर झोपतो आणि तुम्हाला खाली झोपावं लागतंय." यावर अंकिता म्हणते, "म्हणजे त्याला गेम नाही कळला, पण माणसं कळली" आहेत. अंकिता सध्या घराची कॅप्टन आहे. 

लोकप्रिय मराठी गायक आणि बिग बॉस मराठीच्या सीझनचा माजी स्पर्धक असलेल्या उत्कर्ष शिंदेने या प्रोमोवर कमेंट केली आहे. त्याची कमेंट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. "ही ड्यूटी नको, ती ड्यूटी नको, कधी बोलला ❌ शिक्षण नसूनही कधी भाषेत माज, दुसऱ्यांचा अपमान दिसला?❌ कोणाबद्दल वाईट गॉसिप करताना दिसला? ❌ कोणत्या मुलीचा अपमान केला?❌ गेममध्ये टिकण्यासाठी खोटं प्रेमाचं नाटक, रडणं, रुसणं, फुगणं, असं काही एक केलं का ❌ एकटा राहतो, एकटा खेळतो, एकटा भिडतो, एकटा नडतो, आणि एकटाच पुढे पण असणार, दिसणार" असं उत्कर्षने म्हटलं आहे. तसेच surajbhid, fullsupport हे हॅशटॅगही वापरले आहेत. नेटकऱ्यांनी देखील सूरजचं भरभरून कौतुक केलं आहे. 


 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Utkarsh Shinde full support to Suraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.