Varsha Usgaonkar : "बापरे, हिचा नवरा जेव्हा होईल आणि सासू भोगेल..."; निक्कीबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगावकर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 04:22 PM2024-07-31T16:22:23+5:302024-07-31T16:34:09+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Varsha Usgaonkar And Nikki Tamboli : वर्षा यांनी वादानंतर घरातील इतर सदस्यांसमोर त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. तसेच निक्कीच्या होणाऱ्या नवऱ्याची आणि सासूबाबत काळजी व्यक्त केली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Varsha Usgaonkar fight with Nikki Tamboli over bed | Varsha Usgaonkar : "बापरे, हिचा नवरा जेव्हा होईल आणि सासू भोगेल..."; निक्कीबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगावकर?

Varsha Usgaonkar : "बापरे, हिचा नवरा जेव्हा होईल आणि सासू भोगेल..."; निक्कीबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगावकर?

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांच्यात वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. वर्षा उसगावकरांच्या एका चुकीमुळे 'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना जमिनीवर झोपायला सांगितलं आहे.  वर्षा उसगावकरांमुळे जमिनीवर झोपावं लागणार असल्याने निक्की तांबोळीचा राग अनावर झाला. तिने वर्षा यांना खूप सुनावलं आणि याच दरम्यान त्यांचा अपमान करत एकेरी उल्लेख देखील केला. 

वर्षा यांनी या वादानंतर घरातील इतर सदस्यांसमोर त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. तसेच निक्कीच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत आणि सासूबाबत काळजी व्यक्त केली आहे. "कालपासून ती मला तुम्हाला तुम्हाला असं म्हणत होती. आज अचानक एकदम तू वर आली. हरकत नाही... बापरे हिचा नवरा जेव्हा होईल आणि सासू तिची जेव्हा भोगेल... फार वाईट भोगेल हिची सासू असं मला वाटतं" असं वर्षा उसगावकर यांनी म्हटलं आहे. 

बिग बॉसने घरातील सदस्यांना बेडचा वापर करण्याची परवानगी नाही असं सांगितलं होतं. पण पहिल्या दिवशी काहीही काम नसल्याने वर्षा उसगावकर बेडवर झोपल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासह घरातील इतर सदस्यांनाही 'बिग बॉस'ने शिक्षा दिली. 'बिग बॉस'च्या या आदेशानंतर घरातील सर्व सदस्य चिडले. त्यावर वर्षा उसगावकर 'बिग बॉस'ला "चुकून झालं" असं म्हणाल्या. 

निक्कीने मात्र यानंतर आपला संताप व्यक्त केला. "आम्हाला भोगावं लागतंय... तुमच्यामुळे आता आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय" असं म्हटलं. यावर वर्षा यांनी माझ्या एकटीमुळे नाही असं म्हटलं. त्यावर निक्की म्हणते, "तुम्ही झोपला होतात तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती". निक्कीला शांत करत वर्षाताई म्हणतात, "आरडाओरडा करू नको". निक्की शांत बसत नाही उलट त्यांनाच शांत बसण्यास सांगते. 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Varsha Usgaonkar fight with Nikki Tamboli over bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.