Varsha Usgaonkar : "एकेकाळी मी वंडर गर्ल होते आता महाराष्ट्राची माई..."; वर्षा उसगावकरांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 01:40 PM2024-07-30T13:40:14+5:302024-07-30T13:50:38+5:30

Bigg Boss Marathi Season 5 And Varsha Usgaonkar : धमाकेदार परफॉर्मन्स नंतर वर्षा उसगावकर यांनी या शोमध्ये एन्ट्री केली आहे. याच दरम्यान त्यांनी आता एक खंत व्यक्त केली आहे. "एकेकाळी मी महाराष्ट्राची वंडर गर्ल होते आता महाराष्ट्राची माई झालीय" असं म्हटलं आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 Varsha Usgaonkar reaction over wonder girl | Varsha Usgaonkar : "एकेकाळी मी वंडर गर्ल होते आता महाराष्ट्राची माई..."; वर्षा उसगावकरांनी व्यक्त केली खंत

Varsha Usgaonkar : "एकेकाळी मी वंडर गर्ल होते आता महाराष्ट्राची माई..."; वर्षा उसगावकरांनी व्यक्त केली खंत

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू झाला असून त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणाऱ्या पहिल्या सदस्य ठरल्या आहेत. धमाकेदार परफॉर्मन्स नंतर वर्षा यांनी या शोमध्ये एन्ट्री केली आहे. याच दरम्यान त्यांनी आता एक खंत व्यक्त केली आहे. "एकेकाळी मी महाराष्ट्राची वंडर गर्ल होते आता महाराष्ट्राची माई झालीय" असं म्हटलं आहे. 

"मला हल्ली सगळे आई म्हणायला लागलेत. ताई सोडा... वयाचा प्रश्न नाही. माझी मालिका जी आहे त्यामध्ये मी माई होते. एकेकाळी मी महाराष्ट्राची वंडर गर्ल होते आता महाराष्ट्राची माई झाली आहे. काही जण मला वर्षा आई म्हणतात. कुठे वंडर गर्ल अन् कुठे आई... मग मी म्हटलं अरे आई काय, ताई म्हण, माई म्हण... पण मी आता सोडून दिलं, म्हटलं त्यांना आनंद होतोय" असं वर्षा उसगावकर यांनी घरातील इतर सदस्यांशी गप्पा मारताना सांगितलं आहे. 

वर्षा यांना 'बिग बॉस मराठी'च्या घरात पाहताच चाहतेही आनंदी झाले. मात्र पहिल्याच दिवशी त्यांच्यावर घरातील सदस्य चिडल्याचं दिसत आहे. पहिल्याच दिवशी घरात पाणी नसल्याने 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांच्या तोडंचं पाणी पळालं. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळीमध्ये वादाची ठिणगी उडाल्याचं पाहायला मिळत आहे. 

वर्षा उसगावकर बेडरुममध्ये मेकअप करत असल्याचं दिसत आहे. तर हॉलमध्ये सगळे सदस्य त्यांची वाट पाहत आहेत. निक्की त्यांना बोलवायला जाते आणि म्हणते की मेकअप नंतर करा ना प्लीज. त्यावर वर्षा उसगावकर तिला "मला थोडंसं तयार व्हायलाच पाहिजे. तू व्यवस्थित तयार झालीस", असं म्हणतात. तसेच वर्षा यांनी रितेश देशमुखबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. "रितेशने मला चुकीचं सांगितलं. माझी दिशाभूल केली", असं वर्षा उसगावकर 'बिग बॉस मराठी'च्या घरात म्हणाल्या. 'बिग बॉस मराठी'चा होस्ट असलेल्या रितेशबद्दल असं वक्तव्य करताच बिग बॉसनेही मग त्यांचीच शाळा घेतली. 
 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Varsha Usgaonkar reaction over wonder girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.