Bigg Boss Marathi Season 5: कोणाला मिळणार कॅप्टन्सी? बिग बॉसच्या एका ट्विस्टने निक्की झाली खूश; आता रंगणार खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:26 PM2024-08-30T12:26:52+5:302024-08-30T12:27:28+5:30

या आठवड्यात कोण कॅप्टन होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 who will be the next captain a twist made Nikki happy | Bigg Boss Marathi Season 5: कोणाला मिळणार कॅप्टन्सी? बिग बॉसच्या एका ट्विस्टने निक्की झाली खूश; आता रंगणार खेळ

Bigg Boss Marathi Season 5: कोणाला मिळणार कॅप्टन्सी? बिग बॉसच्या एका ट्विस्टने निक्की झाली खूश; आता रंगणार खेळ

Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन पाच आठवडे होत आहेत. दिवसेंदिवस घरातील खेळ रंगत चालला आहे. पहिल्या आठवड्यात घराची कॅप्टन अंकिता होती. त्यानंतर अरबाज कॅप्टन झाला. मात्र त्याला कॅप्टन्सी मिळाल्यानंतर दोनच दिवसात गेम पलटला आणि निक्की तांबोळीला कॅप्टन्सी मिळाली. अरबाजने तिला ती गिफ्ट दिली. आता या आठवड्यात कोण कॅप्टन होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

या आठवड्यातील कॅप्टन्सीचा टास्क पार पडला. अंकिता, जान्हवी, वर्षा, वैभव आणि सूरज या सदस्यांमधून एक जण कॅप्टन होणार आहे. या सदस्यांनाच आपापसात सहमती दर्शवून एक कॅप्टन निवडायचा आहे. पण त्यांच्यात बहुमत न झाल्याने बिग बॉस ट्विस्ट आणतात. बाहेर बसलेले इतर सदस्य कॅप्टन निवडू शकतात असं बिग बॉस जाहीर करतात. बिग बॉसच्या या ट्विस्टने निक्की चांगलीच खूश होते. आता बाहेर बसलेले सदस्य कोणाला कॅप्टन म्हणून निवडणार हे येत्या एपिसोडमध्ये समजणार आहे.

अरबाजने केलं सूरजचं कौतुक 

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अरबाज सूरजचं कौतुक करताना दिसणार आहे. अरबाज सूरजचं कौतुक करत म्हणतोय,"आतमध्ये तू खूप चांगलं बोललास. आजकाल खूप छान खेळत आहेस.. तुला कधी काही सल्ला हवा असेल तर मी कायम तुझ्यासाठी हजर असेन. माझ्याविरोधात गेला तरी आवडेल. एका भावाप्रमाणे मी कायम तुझ्यासोबत असेल. तुझा आजचा खेळ तर मला खूप आवडलाय". 

दरम्यान या आठवड्यात अंकिता, वर्षा, निक्की आणि अरबाज हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यांच्यातील कोणता सदस्य या आठवड्यात बाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे.
 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 who will be the next captain a twist made Nikki happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.