Abhijit Bichukale : सर्वांचीच हवा टाईट होणार, अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 07:48 PM2024-08-17T19:48:30+5:302024-08-17T19:57:12+5:30

Bigg Boss Marathi Season 5 And Abhijit Bichukale : बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री करणार याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

Bigg Boss Marathi Season 5 wild card entry Abhijit Bichukale | Abhijit Bichukale : सर्वांचीच हवा टाईट होणार, अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार?

Abhijit Bichukale : सर्वांचीच हवा टाईट होणार, अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार?

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या सर्वाचंच लक्ष वेधून घेतोय. घरातील सदस्यांचा वादामुळे तो चर्चेत आला आहे. प्रत्येक स्पर्धकाचं आता खरं रूप हळूहळू समोर येत आहे. कधी प्रेमाचे वारे वाहतात, कधी भावनांना पूर येतो तर कधी कडाक्याची भांडणं होतात. बिग बॉसच्या घरात दोन ग्रुप झाले असून त्यांच्यातील गमतीजमती पाहायलाही मजा येते. अशातच आता लवकरच बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होण्याची शक्यता आहे. 

बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री करणार याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर अनेक नावांची तुफान चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया स्टार हिंदुस्थानी भाऊ आणि आरजे सुमीत पाटील घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याचं म्हटलं जात असताना आता आणखी एक नाव पुढे आलं आहे. ते म्हणजे कवी मनाचे नेते आणि बिग बॉसचे माझी स्पर्धक अभिजित बिचुकले. 


बिग बॉस मराठी या रिएलिटी शोच्या माध्यमातून अभिजीत बिचुकले यांनी एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. ते कायम वादग्रस्त विधानांमुळेच चर्चेत असतात. त्यांनी बिग बॉसच्या घरातही कल्ला केला होता. आपल्या हटके स्टाईलमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. घरातील सदस्यांशी देखील त्यांनी वाद घातला. यावेळी जर अभिजीत बिचुकले यांची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली तर ते घरातील कोणत्या सदस्यांशी पंगा घेणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

"एका हिरोने जन्म घेतला, संधीचं सोनं केलं..."

'बिग बॉस मराठी'चा तिसरा आठवडा गोलीगत फेम सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला आहे. रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर सूरजचं भरभरून कौतुक करताना दिसणार आहे. या आठवड्यात सूरज घराचा कॅप्टन झालेला नसला तरी त्याने चांगलीच बाजी मारली आहे. पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसरा आठवड्यात कॅप्टनसी टास्कमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "या आठवड्यात एका हिरोने जन्म घेतला. ज्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय त्याचं नाव आहे सूरज चव्हाण. अख्ख घर म्हणतं त्याला गेम कळत नाही. पण या आठवड्यात फक्त सूरजचाच गेम दिसला. त्याने एकट्याने सर्वांना टफ फाईट दिली" असं रितेश म्हणणार आहे. 
 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 wild card entry Abhijit Bichukale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.