"आता सूरज अजून जास्त स्ट्रॉंग होणार", संग्राम चौगुलेच्या पत्नीची सूचक पोस्ट म्हणते, 'मला तुझा...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 14:58 IST2024-09-10T14:55:20+5:302024-09-10T14:58:42+5:30
सध्या 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा सातवा आठवडा सुरू झाला आहे.

"आता सूरज अजून जास्त स्ट्रॉंग होणार", संग्राम चौगुलेच्या पत्नीची सूचक पोस्ट म्हणते, 'मला तुझा...'
Sangram Chougule Wife Reaction : सध्या 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा सातवा आठवडा सुरू झाला आहे. अशातच सोमवारी 'बिग बॉस'च्या घरामध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने घरात प्रवेश केला. आपल्या धमाकेदार एन्ट्रीने त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतन घरात पाऊल ठेवताच संग्रामने निक्की आणि अरबाजसोबत पंगा घेतला. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये आपसाआपसांत कुजबूज पाहायला मिळते आहे. संग्रामचा घरातील वावर पाहून त्याचे चाहतेही सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अशातच संग्राम चौगुलेच्या पत्नीने सोशल मीडियावर एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे.
संग्रामने 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करताच आपला खेळ दाखवण्यास सुरूवात केली. या नव्या घरामध्ये संग्रामची सूरजबरोबर चांगलीच गट्टी जमतेय. दरम्यान, संग्रामच्या पत्नीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संग्राम घरातील जीम एरियामध्ये सूरज चव्हाणला पुश अप्स कसे मारतात? याचे प्रशिक्षण देत आहे. तर आर्या संग्रामचे पुश अप्स काउंट करत आहे. व्हिडीओमध्ये गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण संग्रामसोबत वर्कआउट करताना दिसतोय. तेव्हा एकाचवेळी संग्राम ७५ पुश अप्स मारतो. त्यादरम्यान, मी एक वेळेस ५०० बैठका मारायचो तेही अगरबत्ती लावून सराव करायचो, असं तो सांगतो.
संग्रामच्या पत्नीने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने सूरज चव्हाणला टॅग करत म्हटलंय, "आता सूरज अजून जास्त स्ट्रॉंग होणार! मला तुझा अभिमान आहे " असं लिहित तिने पती संग्रामला टॅग केलंय. पुढे तिने बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांनाही टॅग केल्याचं पाहायला मिळतंय.
अगदी गेल्या आठवड्यातच 'बिग बॉस' च्या घरातून छोटा पुढारी घनश्याम दरवडे बाहेर पडलाा. तर या आठवड्यात धष्टपुष्ट शरीरयष्टी असलेल्या संग्राम चौगुलेने वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतल्याने खेळात मोठा ट्विस्ट आला आहे. आता बिग बॉसचा खेळ अधिक रंजक होताना दिसत आहे.