"राणी माझ्या मळ्यामंदी...", गुलीगत किंग सूरजचा गावरान अंदाज; नव्या व्हिडीओचं होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:28 IST2024-10-30T16:19:38+5:302024-10-30T16:28:21+5:30
'बिग बॉस मराठी' ५ विजेता सूरज चव्हाणने (Suraj Chavan) आपल्या गुलीगत स्टाईलने यंदाचं पर्व दणाणून सोडलं.

"राणी माझ्या मळ्यामंदी...", गुलीगत किंग सूरजचा गावरान अंदाज; नव्या व्हिडीओचं होतंय कौतुक
Suraj Chavan: 'बिग बॉस मराठी' - ५ विजेता सूरज चव्हाणने (Suraj Chavan) आपल्या गुलीगत स्टाईलने यंदाचं पर्व दणाणून सोडलं. एका बुक्कीत टेंगुळ म्हणत सूरजने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला.
'बिग बॉस मराठी' च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्याने स्वत:चे वेगळेपण दाखवले. त्याने वाद घातले, राडे केले. पण त्यातही त्याने स्वत:ची बाजू उत्तम पद्धतीने राखली. प्रत्येक टास्क त्याने डोकं लावून खेळला म्हणूनच तो इथवर पोहोचला आणि या पर्वाचा विजेताही ठरला. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं त्याला प्रेम मिळत आहे. सगळीकडे सूरजच्या नावाचीच चर्चा होताना दिसते. अशातच नुकतीच सूरजने सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याच्या व्हिडीओला बॅकग्राउंडला "राणी माझ्या मळ्यामंदी..." हे गाणं वाजत आहे.
सूरज या व्हिडीओमध्ये गावरान अंदाजात पाहायला मिळतो आहे. कधी शेतातील ट्रॅक्टर चालवताना तर कधी मेढ्यांच्या कळपासोबत झापुक झुपूक स्टाईलमध्ये दिसतोय. शिवाय व्हिडीओमध्ये डोळ्यांना गॉगल तसेच खांद्यावर काठी असा त्याचा लूक चाहत्यांना आवडला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अगदी काही तासांमध्ये सूरज चव्हाणच्या या व्हिडीओवर लाखोंच्या घरात लाईक्स मिळाल्या आहेत.