'बिग बॉस' विजेत्या सूरज चव्हाणची केदार शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणाला- "माझा देव..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 11:40 AM2024-12-02T11:40:54+5:302024-12-02T11:43:26+5:30
गुलिगत किंग सूरज चव्हाणची केदार शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणाला-"माझा देव"
Suraj Chavan: 'बिग बॉस मराठी' सीझन ५ (Bigg Boss Marathi 5) विजेता सूरज चव्हाणची (Suraj Chavan) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हालाखीच्या परिस्थितीवर मात करत 'बिग बॉस'च्या घरात पोहोचलेला सूरज अनेकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत ठरत आहे. दरम्यान, हा शो संपून बराच काळ उलटला आहे, परंतु सूरजने प्रेक्षकांच्या मनात मिळवलेलं स्थान कायम आहे. छोट्याश्या मोढवे गावातून आलेला सूरज आता संपूर्ण महाराष्ट्राच्या परिचयाचा झाला आहे. सूरजला बिग बॉसमध्ये सहभागी करुन घेण्यास कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदेंचंही मोठं योगदान आहे. 'बिग बॉस'नंतरही केदार शिंदे आणि सूरज चव्हाणचं खास नातं बघायला मिळतंय. याचा प्रत्यय सूरजने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट पाहून येतोय.
गुलिगत किंग सूरज चव्हाणने नुकतीच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने केदार यांच्यासोबतचा एका फोटो शेअर केल्याचा पाहायला मिळतोय. सूरजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय, "माझा देव." त्याची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. सूरजच्या या पोस्टवर "सूरजला साक्षात श्री स्वामी समर्थ भेटले..." अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर आणखी एक यूजर म्हणतो- "त्या इतिहासात देखील नोंदवल गेलं, एका गरीबाच पोरगं हिरो झालं..."
सूरज 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन जिंकताच संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. सूरज जिंकताच कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड आणि सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक केदार शिंदेंनी त्याला सिनेमाची ऑफर दिली. 'झापुकझुपुक' असं केदार शिंदेंनी ऑफर केलेल्या सिनेमाचं नाव असून यात सूरज प्रमुख भूमिका साकारणार आहे.