'बिग बॉस'च्या घरात निक्की ढसढसा रडली, पण नेमकं काय घडलंं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 08:46 AM2024-09-26T08:46:23+5:302024-09-26T08:46:56+5:30
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाचा सीझन केवळ 70 दिवसांत संपणार आहे
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चे पाचवे पर्व २८ जुलै रोजी सुरू झाले, या दिवशी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर पार पडला आणि अवघ्या महाराष्ट्रात या शोची चर्चा सुरू झाली. बिग बॉस मराठीच्या चाहत्यांनी आपापला आवडता स्पर्धक निवडला आहे. शिवाय बिग बॉसच्या घरात टिकवून राहण्यासाठी सदस्यही शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
प्रत्येक आठवड्याला घरात नवा टास्क पार पडत असतो. आताही 'बिग बॉस मराठी'च्या घरात नवा टास्क 'महाचक्रव्युह' पाहायला मिळाला आहे. या टास्कसाठी जोड्या पाडण्यात आल्या. 'महाचक्रव्युह' टास्कमध्ये सदस्यांना 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनच्या विजेत्याला मिळणारी २५ लाख रुपये ही बक्षिसाची रक्कम होती. या 'महाचक्रव्यूह'च्या खेळात एका सदस्यांच्या डोळ्या पट्टी बांधलेली असेल. तर दुसरा सदस्य त्याचे डोळे बनून त्याला मार्गदर्शन करेल.
'महाचक्रव्यूह'चा खेळ खेळण्यासाठी पहिली जोडी धनंजय आणि जान्हवी जाते. ते ६ लाख २५ हजार रुपयांपैकी १ लाख ३० हजार मिळवतात. तर पुढे अंकिता आणि अभिजीत ३ लाख १५ हजार रुपये कमावतात. बिग बॉस वर्षा आणि निक्की यांची जोडी करतात. निक्की-वर्षा यांनी २ लाख ८५ हजार कमावतात. पण, निक्कीचा टास्क संपला तेव्हा ४३ सेकंद बाकी राहिले होते. या ४३ सेकंदात ती आणखी झेंडे गोळा करून रक्कम जमा करु शकली असती. पण, वेळा वाया गेल्यामुळे ती प्रचंड नाराज झाली.
शिवाय, टास्कमध्ये तिने ५० हजार रक्कम असलेली चांदीची वीट आणली नाही. वर्षा यांनी व्यवस्थित मार्गदर्शन न केल्यामुळे निक्कीने त्या चांदीच्या विटेऐवजी रिकामी भांडं उचललं. यामुळे टीमचे मोठे नुकसान झाले. कमी रक्कम कमावल्यामुळे निक्की ढसाढसा रडली. निक्की रडत म्हणाली, 'खरंच किती वाईट खेळलोच, याची मला लाज वाटते. मी कोणालाही दोष देत नाहीये पण, खरंच चांगला खेळता आलं असतं". तर आजच्या एपिसोडमध्ये महाचक्रव्युहात पॅडी-सूरज जाणार आहेत.