वर्षा की निक्की... या आठवड्यात कोण होणार घराबाहेर? थेट नॉमिनेट झालेत घरातील ६ सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:22 AM2024-09-11T10:22:58+5:302024-09-11T10:23:49+5:30

नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात नॉमिनेशन टॉस्क पार पडला. यावेळी घरातील ६ सदस्य थेट नॉमिनेट झाले आहेत.

Bigg Boss Marathi seventh week Nomination Task Varsha, Nikki, Arya, Abhijeet, Vaibhav and Ankita Nominated | वर्षा की निक्की... या आठवड्यात कोण होणार घराबाहेर? थेट नॉमिनेट झालेत घरातील ६ सदस्य

वर्षा की निक्की... या आठवड्यात कोण होणार घराबाहेर? थेट नॉमिनेट झालेत घरातील ६ सदस्य

Bigg Boss Marathi 5 Nomination: 'बिग बॉस' मराठीच्या नव्या सीझनची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.  नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात नॉमिनेशन टॉस्क पार पडला. यावेळी घरातील ६ सदस्य थेट नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांना इम्युनिटी कार्य देण्यात आलं आहे. या कार्यात जादुच्या दिव्यात इम्युनिटी बंदिस्त होती. कोणत्या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे, हे जाणून घेऊया. 

नॉमिनेशन टास्कमध्ये प्रत्येक सदस्याच्या गळ्यात घरातील एका सदस्याचा फोटो अडकविण्यात आला होता.  अंकिताच्या गळ्यात जान्हवीचा, धनंजयच्या गळ्यात अभिजीतचा, वर्षा उसगांवकर यांच्या गळ्यात धनंजयचा, अभिजीतच्या गळ्यात आर्याचा, तर आर्याच्या गळ्यात वैभव चव्हाणचा फोटो अडकवण्यात आला होता. तर वैभव चव्हाणच्या गळ्यात अंकिताचा, पॅडीच्या गळ्यात अरबाजचा फोटो होता. तर निक्कीचा फोटो हा जान्हवीच्या गळ्यात आणि निक्कीच्या गळ्यात  पॅडीचा फोटो अडकवण्यात आला होता. तर अरबाजच्या गळ्यात वर्षा उसगांवकर यांचा फोटो होता. 


आपल्या गळ्यात ज्या स्पर्धकाचा फोटो अडकवला आहे, त्याला वाचवायचं की नाही हा निर्णय घ्यायचा होता. यामध्ये जान्हवी, धनंजय, पॅडी, अरबाज हे सेफ आहेत. तर सुरज हा कॅप्टन असल्याने सेफ आहे. शिवाय  वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून एन्ट्री घेतलेला संग्राम चौगुलेदेखील सेफ आहे. तर वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, आर्या जाधव, अभिजीत सावंत, वैभव चव्हाण आणि अंकिता प्रभू- वालावलकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.  या सहा सदस्यांपैकी या आठवड्यात कुणाचा प्रवास संपणार हे भाऊच्या धक्क्यावर कळेल. 

Web Title: Bigg Boss Marathi seventh week Nomination Task Varsha, Nikki, Arya, Abhijeet, Vaibhav and Ankita Nominated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.