Bigg Boss OTT 2 : पहिल्या नॉमिनेशननंतर आता या चार सदस्यांवर टांगती तलवार, कोण जाणार घराबाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 07:21 PM2023-06-20T19:21:48+5:302023-06-20T19:22:01+5:30

Bigg Boss OTT 2 : सलमान खानचा शो बिग बॉस ओटीटी २ गेल्या आठवड्यात १७ जून रोजी सुरू झाला. बिग बॉसने पहिल्या आठवड्यात नॉमिनेशन राउंड देखील पार पडले. बिग बॉसने सोमवारी नॉमिनेशनची घोषणा केली.

Bigg Boss OTT 2: After the first nomination, now the sword hangs on these four members, who will go out of the house? | Bigg Boss OTT 2 : पहिल्या नॉमिनेशननंतर आता या चार सदस्यांवर टांगती तलवार, कोण जाणार घराबाहेर?

Bigg Boss OTT 2 : पहिल्या नॉमिनेशननंतर आता या चार सदस्यांवर टांगती तलवार, कोण जाणार घराबाहेर?

googlenewsNext

सलमान खान(Salman Khan)चा शो बिग बॉस ओटीटी २ (Bigg Boss OTT 2) गेल्या आठवड्यात १७ जून रोजी सुरू झाला. बिग बॉसने पहिल्या आठवड्यात नॉमिनेशन राउंड देखील पार पडले. बिग बॉसने सोमवारी नॉमिनेशनची घोषणा केली. याआधी शो सुरू झाल्यानंतर १२ तासांनंतर बिग बॉसने पुनीत सुपरस्टारला बाहेरचा रस्ता दाखवला होता. कारण त्याने नियमाचे उल्लंघन करून घराच्या मालमत्तेचे नुकसान करण्याचे काम केले होते. पुनीत बाहेर पडल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. पुनीत बाहेर पडल्यानंतर घरात १२ स्पर्धक उरले आहेत, ज्यांच्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे.

बिग बॉस ओटीटी २ च्या आगामी भागाचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये नॉमिनेशन प्रक्रियेची झलक दाखवण्यात आली आहे. या आठवड्यासाठी चार जणांचे नामांकन करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या यादीत बाबिका धुर्वेपासून अविनाश सचदेवपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. बाबिका धुर्वे आणि अविनाश सचदेव यांच्याशिवाय पलक पुरसवानी आणि जिया शंकर यांना या आठवड्यात घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले आहे.

प्रीमियरच्या सुरुवातीपासूनच, पुनीत त्याच्या वागण्यामुळे बिग बॉसच्या चर्चेत आला. खरेतर, सोशल मीडिया इन्फ्लुयन्सर आणि कंटेट क्रिएटर प्रकाश कुमार उर्फ ​​पुनित सुपरस्टारला त्याच्या असभ्य वर्तनासाठी आणि बिग बॉसच्या मालमत्तेची नासधूस केल्याबद्दल काही तासांतच घरातून काढून टाकण्यात आले. पुनीत बाथरूममध्ये दोन फॅमिली पॅक टूथपेस्टच्या ट्युब वाया घालवत होता. त्याने ट्यूब घेतली आणि त्याच्या चेहऱ्यावर पेस्ट लावली आणि दावा केला की तो आपली त्वचा राखण्यासाठी दररोज असे करतो.

Web Title: Bigg Boss OTT 2: After the first nomination, now the sword hangs on these four members, who will go out of the house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.