bigg boss OTT 2: फर्स्ट रनरअप ठरलेला अभिषेक मल्हान रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 02:31 PM2023-08-15T14:31:45+5:302023-08-15T14:32:15+5:30

Abhishek malhan: अभिषेकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्याच्या रुग्णालयात दाखल होण्यामागचं कारण सांगितलं आहे.

bigg-boss-ott-2-runner-up-abhishek-malhan-hospitalised-due-to-dengue-shares-video | bigg boss OTT 2: फर्स्ट रनरअप ठरलेला अभिषेक मल्हान रुग्णालयात दाखल

bigg boss OTT 2: फर्स्ट रनरअप ठरलेला अभिषेक मल्हान रुग्णालयात दाखल

googlenewsNext

 बिग बॉस ओटीटी 2 (bigg boss OTT 2) चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. यंदा एल्विश यादव हा या सिझनचा विजेता ठरला आहे. तर, एल्विशला काटे की टक्कर देणारा अभिषेक मल्हान हा फर्स्ट रनरअप ठरला. विशेष म्हणजे हा ग्रँड फिनालेचा भाग संपल्यानंतर तातडीने अभिषेकला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.इतकंच नाही तर या ग्रँड फिनालेमध्ये सुद्धा फुकरा इन्सान म्हणजेच अभिषेक उपस्थित राहू शकला नाही. अभिषेक या भागात न दिसल्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. परंतु, आता त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.

अभिषेकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्याला बरं नसल्याचं सांगितलं. त्याला डेंग्यू झाल्यामुळे तो ग्रँड फिनालेमध्येही हजर राहू शकला नाही. परंतु, या व्हिडीओमध्ये त्याने त्याचे हेल्थ अपडेट देण्यासोबतच चाहत्यांचे आभारदेखील मानले.

“मी काही लोकांना निराश केलं असेन कारण मी ट्रॉफी जिंकू शकलो नाही. मात्र एल्विशला ही ट्रॉफी जिंकल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा,” असं अभिषेकने म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच तू ट्रॉफी जिंकली नाहीस पण, आमचं मनं जिंकलं आहे. असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अभिषेक मल्हान बिग बॉस ओटीटी २मधील लोकप्रिय स्पर्धक होता. सोशल मीडियावरही त्याचा तगडा फॅनफॉलोअर्स आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 4.6 दशलक्ष फॉलोअर्स आणि युट्यूबवर 7.42 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. युट्यूबवर अभिषेकचे फुकरा इन्सान लाइव्ह, मल्हान रेकॉर्ड्स, फुकरा इन्सान शॉर्ट्स असे तीन चॅनेल्स आहेत. अभिषेकचा भाऊ आणि आईसुद्धा व्लॉगर आहेत. 
 

Web Title: bigg-boss-ott-2-runner-up-abhishek-malhan-hospitalised-due-to-dengue-shares-video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.