बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; वाइल्ड कार्ड एन्ट्री 'एल्विश' पडला सगळ्यांवर भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 00:40 IST2023-08-15T00:14:54+5:302023-08-15T00:40:26+5:30
बिग बॉसच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे की, शोमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेणारा स्पर्धक विजेता ठरला आहे.

बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; वाइल्ड कार्ड एन्ट्री 'एल्विश' पडला सगळ्यांवर भारी
'बिग बॉस ओटीटी सीझन २'च्या विजेता गुरुग्रामचा २५ वर्षीय एल्विश यादव ठरला आहे. प्रसिद्ध युट्युबर असलेल्या एल्विशने या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेतली होती. एल्विश यादवने ट्रॉफीसह २५ लाखांचं बक्षिस जिंकलं आहे. अभिषेक यादव फर्स्ट रनर तर मनीषा रानी सेकंड रनरअप ठरली. सलमानने विजेत्याच्या नावाची घोषणा करताच एल्विशच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असेल घडलं की वाईल्ड कार्ड एंट्री घेणारा स्पर्धक शोचा विजेता ठरला.
बिग बॉस ओटीटीच्या टॉप तीन स्पर्धकांमध्ये एल्विश यादव, मनीषा रानी आणि अभिषेक मल्हान यांचा समावेश होते. एल्विश यादव आणि अभिषेक मल्हानमध्ये अटी तटीचा सामना झाला. मात्र यात एल्विशने बाजी मारली. कृष्णा अभिषेक आपल्या मजेदार अंदाजात स्पर्धकांसह प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आयुषमान खुराना आणि अनन्या पांडे आपला सिनेमा 'ड्रीम गर्ल२'च्या प्रमोशनसाठी शोमध्ये आले होते. यावेळी इतर स्पर्धकांनीसुद्धा परफॉर्म केलं.
'बिग बॉस ओटीटी सीझन २' प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहिला. सलमान खानची जादू चालली आणि हा शो सुपरहिट झाला. या सीझनमध्ये पूजा भटची माणुसकी, अभिषेकचा दमदार खेळ, मनीषा राणीचा लटके-झटके, एल्विशचा पंचलाइन आणि बबिका धुर्वेचा आवाज-शराबा यांनी बीबी हाऊसला टीआरपी मिळवून दिली.
सहभागी झालेले स्पर्धक
फलक नाज, जिया शंकर, अभिषेक मल्हान, आकांक्षा पुरी, सायरस ब्रोचा, मनिषा राणी, जाद हदीद, आलिया सिद्दीकी,बेबिका धुर्वे,अविनाश सचदेव, पलक पुरसवानी आणि पुनीत सुपरस्टार सारखे कलाकार यावेळी शोचा भाग होते.