Bigg Boss OTT 3 मध्ये स्पर्धकांकडे असणार मोबाईल? अनिल कपूरने दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 05:07 PM2024-06-21T17:07:41+5:302024-06-21T17:08:56+5:30

स्पर्धकांना चक्क मोबाईल वापरता येणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर अनिल कपूरने काय प्रतिक्रिया दिली बघा.

Bigg Boss OTT 3 Anil Kapoor gave hint are mobile phones allowed in house | Bigg Boss OTT 3 मध्ये स्पर्धकांकडे असणार मोबाईल? अनिल कपूरने दिली हिंट

Bigg Boss OTT 3 मध्ये स्पर्धकांकडे असणार मोबाईल? अनिल कपूरने दिली हिंट

'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT 3) ची सुरुवात लवकरत होत आहे. यंदाच्या सीझनमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे सलमान खानच्या जागी अभिनेते अनिल कपूर शोचे होस्ट असणार आहेत. अनिल कपूर त्यांच्या स्टाईलमध्ये स्पर्धकांना धारेवर धरणार आहेत. शोचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. आजपासून शो सुरु होत असून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. दरम्यान शोमध्ये आणखी एक बदल असण्याची शक्यता आहे. स्पर्धकांना चक्क मोबाईल वापरता येणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर अनिल कपूरने काय प्रतिक्रिया दिली बघा.

बिग बॉस ओटीटी 3 संदर्भात नुकतीच पत्रकार परिषद झाली. यावेळी बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीही उपस्थित होता. यावेळी त्याने अनिल कपूरला यावेळी शोमध्ये काय वेगळं असणार असं विचारलं. तसंच घरात मोबाईल वापराला परवानगी असणार का हेही विचारलं. यावर अनिल कपूर म्हणाला, "काहीही होऊ शकतं. जे पहिले नाही झालं ते काय माहित यावेळी होईल."

सध्या सर्वच अंदाज लावत आहेत की यावेळी स्पर्धक मोबाईलचा वापर करु शकतात. मात्र यावरुन आज रात्रीच पडदा उठणार आहे. जिओ सिनेमावर शो प्रसारित होणार आहे. आज रात्री याचा प्रिमियर येत आहे ज्यामध्ये कोण कोण स्पर्धक घरात जाणार याचा खुलासा होणार आहे. दिल्लीची 'वडापाव गर्ल' चंद्रिका दीक्षित, गली बॉयमधला नॅजी आणि 'इमली'फेम केतन राव, अभिनेत्री सना मकबूल शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत.

Web Title: Bigg Boss OTT 3 Anil Kapoor gave hint are mobile phones allowed in house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.