Bigg Boss OTT 3: अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीला रडू कोसळलं; म्हणाली, 'दोघांना चांगलं ओळखून आहे'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 12:15 PM2024-06-27T12:15:21+5:302024-06-27T12:16:16+5:30

Bigg Boss OTT 3: युट्यूबर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीने सांगितला सगळा घटनाक्रम, बेस्ट फ्रेंडनेच कसं केलं पतीशी लग्न!

Bigg Boss OTT 3 Armaan Malik s first wife Payal Malik had breakdown when she was talking about husband s second marriage | Bigg Boss OTT 3: अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीला रडू कोसळलं; म्हणाली, 'दोघांना चांगलं ओळखून आहे'

Bigg Boss OTT 3: अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीला रडू कोसळलं; म्हणाली, 'दोघांना चांगलं ओळखून आहे'

'बिग बॉस OTT 3' (Bigg Boss OTT 3) ला काही दिवसांपूर्वीच धमाकेदार सुरुवात झाली. १६ स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. या स्पर्धकांमध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती युट्यूब अरमान मलिकची (Armaan Malik). तो त्याच्या दोन्ही पत्नींसोबत सहभागी झाला आहे. सोशल मीडियावर हे तिघंही भलतेच ट्रोल होतात. आता बिग बॉसमध्ये त्यांना एन्ट्री दिल्याने अनेकांनी बिग बॉसवरही टीका केली आहे. नुकतंच अरमान मलिकची पहिली पत्नी पायल (Payal Malik) पतीच्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलताना रडली. 

बिग बॉसच्या मेकर्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये पायल मलिक पती अरमान आणि दुसरी पत्नी कृतिकाच्या लग्नाबाबत बोलत आहे. त्या दिवसाची आठवण सांगताना पायल म्हणाली, " एक दिवस मी नसताना कृतिका आणि अरमान एकत्र बाहेर गेले होते आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघंही लग्न करुनच परत आले आणि त्यांनी मला फोन करत गुडन्यूज असल्याचं सांगितलं. मला लगेच कळलं की दोघांनी लग्न केलं आहे."

ती पुढे म्हणाली, "अरमाननेच तिला विचारलं असणार लग्न करुया आणि कृतिकाही हो म्हणाली. मी या दोघांनाही चांगलंच ओळखते. त्यांनी फोन केला तेव्हाच मी विचारलं की तुम्ही लग्न केलं?"

पायलने घरातील सदस्यांना ही सर्व घटना सांगितली. यावेळी अरमान आणि कृतिकाही सोफ्यावर बसून ऐकत होते. तेवढ्यात मुनीषाने पायलला विचारलं की,'तुला वाटतं का की तुझ्या बेस्ट फ्रेंडने तुझा विश्वासघात केला आहे?' यावर पायलला अश्रू अनावर झाले आणि उत्तर द्यायच्या आतच तिला रडू कोसळलं. अरमान लगेच तिला धीर द्यायला गेला. तर कृतिका म्हणाली पायला नेहमी हे सांगताना भावूक होते. इतर स्पर्धकही पायलजवळ जाऊन तिला धीर देतात.  तुझं मन खूप मोठं आहे असं म्हणतात. मग अरमान पायलला विचारतो, 'आता तर खूश आहेस ना? मला तर वाटतं की याच दोघींचं लग्न झालंय. माझा तर मध्ये काही रोलच नाहीए.'

Web Title: Bigg Boss OTT 3 Armaan Malik s first wife Payal Malik had breakdown when she was talking about husband s second marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.