अरमानची पहिली पत्नी पायल मलिकने मागितला घटस्फोट, म्हणाली, "आणखी सहन करणार नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 12:49 PM2024-07-20T12:49:24+5:302024-07-20T12:52:59+5:30

लोकांचे टोमणे ऐकून वैतागल्याने ती मुलांना घेऊन अरमानपासून वेगळी होणार?

Bigg Boss OTT 3 Armaan s first wife Payal Malik asked for a divorce saying I won't take it anymore | अरमानची पहिली पत्नी पायल मलिकने मागितला घटस्फोट, म्हणाली, "आणखी सहन करणार नाही..."

अरमानची पहिली पत्नी पायल मलिकने मागितला घटस्फोट, म्हणाली, "आणखी सहन करणार नाही..."

'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये युट्युबर अरमान मलिक (Armaan Malik) आणि त्याच्या दोन्ही पत्नी सहभागी झाल्या. त्यांना बिग बॉसमध्ये संधी दिल्याने नेटकरी चांगलेच नाराज झाले. यावरुन सोशल मीडियावर बिग बॉसलाही खरंखोटं सुनावण्यात आलं. कही दिवसांपूर्वी अरमानची पहिली पत्नी पायल घरातून एलिमिनेट झाली. आता तिने आपल्या व्हिडिओतून अरमानला घटस्फोट देणार असल्याचं सांगितलं. लोकांचे टोमणे ऐकून वैतागल्याने ती मुलांना घेऊन अरमानपासून वेगळी होण्याचा विचार करत आहे.

पायल मलिक (Payal Malik) आपल्या लेटेस्ट व्लॉगमध्ये म्हणाली, "आमचं नातं संपुष्टात यावं हीच लोकांचा इच्छा आहे. आम्ही तिघांनी वेगळं व्हावं हे त्यांना हवं आहे. त्यामुळेच मी विचार करतेय की इतकं सगळं सहन करण्यापेक्षा मी मुलांना घेऊन वेगळी होते. कारण खूप सहन केलं आता नाही सहन करु शकत. त्या दोघांना तर बाहेर काय बोललं जातंय याची कल्पनाच नाहीए. कारण ते घरात त्यांचा खेळ खेळत आहेत.  त्यांना काहीच चिंता नाहीए. पण मला दिवसरात्र टेन्शन आहे. घर सांभाळा, मुलांना सांभाळा, लोकांचं ऐका, ट्रोलिंग सहन करा, शिव्या ऐका, मुलांबद्दल वाईट ऐका इतकं मी ऐकून घेऊ शकत नाही. मी हे सारासार विचार करुन बोलत आहे."

अरमान आणि त्याच्या दोन्ही पत्नींना सुरुवातीपासूनच नेटकऱ्यांनी धारेवर धरले होते. आताही त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. अभिनेत्री देवोलिनानेही त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर पायल आणि देवोलिना मध्ये शा‍ब्दिक भांडणंही झाली. आता पायल अरमानपासून खरंच घटस्फोट घेते का हे पाहणं महत्वाचं आहे.

Web Title: Bigg Boss OTT 3 Armaan s first wife Payal Malik asked for a divorce saying I won't take it anymore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.