BB OTT 3: दुसऱ्या पत्नीबद्दल 'ते' वाक्य ऐकताच भडकला अरमान, विशालच्या लगावली कानशिलात, व्हिडिओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 04:51 PM2024-07-07T16:51:36+5:302024-07-07T16:52:04+5:30
'बिग बॉस ओटीटी'च्या घरात राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशाल पांडेने दुसरी पत्नी कृतिकाबद्दल केलेलं वक्तव्य ऐकून अरमान भडकला आणि त्याने सरळ विशालच्या कानशिलातच लगावली.
Bigg Boss OTT 3: अलिकडेच सुरू झालेला 'बिग बॉस ओटीटी'चा नवा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यंदाच्या सीझनमध्ये युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिकाला घेऊन सहभागी झाला होता. 'बिग बॉस'च्या घरात अरमान आणि त्याच्या दोन पत्नींना पाहून चाहते आश्चर्यचकित झाले होते. पहिल्याच आठवड्यात अरमानची पहिली पत्नी पायल 'बिग बॉस'च्या घरातून एलिमिनेट झाली. पण, त्यानंतर मात्र घरात हंगामा झाल्याचं पाहायला मिळालं.
जसे जसे दिवस पुढे सरकत आहेत, तसे 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावरील रंग दिसू लागले आहेत. 'बिग बॉस'च्या घरात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विशाल पांडेने दुसरी पत्नी कृतिकाबद्दल केलेलं वक्तव्य ऐकून अरमान भडकला आणि त्याने सरळ विशालच्या कानशिलातच लगावली. जिओ सिनेमाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अरमान विशालला विचारतो की "तू पहिल्यापासूनच ही वाईट सवय आहे की आता लागली आहे?".
त्यावर विशाल त्याला म्हणतो, "माझ्या बोलण्याचा तो उद्देश नव्हता". विशालचं हे उत्तर ऐकून अरमान लवकेश कटारियाकडे पाहून "तू तर काहीच बोलत नाहीस...आज माझ्या पत्नीसाठी असं बोलला आहे. उद्या तुझ्याबाबतीतही होईल," असं म्हणतो. त्यानंतर विशाल कटारियाला विचारतो की मी तुला काय म्हणालो होतो, ते फक्त सांग. त्यावर लवकेश कटारिया म्हणतो, "तू असं म्हणाला होतास की मुझे भाभी अच्छी लगती है". पायलबद्दल हे ऐकताच अरमान भडकतो. त्याचा पारा सुटतो आणि तो सरळ विशालच्या कानशिलात लगावत असल्याचं दिसत आहे.
'बिग बॉस ओटीटी'च्या घरातील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी विशालवर हात उचलणाऱ्या अरमानला घराबाहेर काढण्याचं म्हटलं आहे. आता यावर 'बिग बॉस' काय अॅक्शन घेणार हे पाहावं लागेल.