Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस'च्या घरात बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री, सलमानबरोबर केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 10:00 PM2024-06-21T22:00:39+5:302024-06-21T22:01:25+5:30

'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. यंदाच्या पर्वात कोण सहभागी होणार? याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या.

Bigg Boss OTT 3 bollywood actor ranvir shorey enter in the house anil kapoor show | Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस'च्या घरात बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री, सलमानबरोबर केलंय काम

Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस'च्या घरात बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री, सलमानबरोबर केलंय काम

Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी'च्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे.  'बिग बॉस ओटीटी'चं दुसरं पर्व संपल्यापासूनच चाहते 'बिग बॉस ओटीटी ३'च्या प्रतिक्षेत होते. अखेर शुक्रवारी(२१ जून) 'बिग बॉस'च्या तिसऱ्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली.  'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. यंदाच्या पर्वात कोण सहभागी होणार? याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. अनेक नाव गुलदस्त्यात होती. त्यानंतर आता अखेर या नावांवरुन पडदा हटविण्यात आला आहे. 

'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये यंदा बॉलिवूड अभिनेताही दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये सहभागी झाला आहे. रणवीरने दणक्यात 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. यंदाच्या सीझनमध्ये रणवीर शौरी दिसणार असल्याची चर्चा होती. त्याच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. आता रणवीर 'बिग बॉस'च्या घरात टिकून राहण्यासाठी कोणती रणनीती वापरणार, हे पाहावं लागेल. 

दरम्यान, रणवीर शौरीने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'प्यार के साइड इफेक्ट', 'मोह माया मनी', 'आजा नचले', 'सिंग इज किंग' अशा सिनेमांमध्ये तो झळकला आहे. एक था टायगर या सलमान खानच्या चित्रपटातही त्याने काम केलं आहे. 'सॅक्रेड गेम्स' या वेब सीरिजमध्येही तो झळकला आहे. काही दिवसांपूर्वी राम मंदिरबाबत केलेल्या विधानामुळे तो चर्चेत आला होता. 

Web Title: Bigg Boss OTT 3 bollywood actor ranvir shorey enter in the house anil kapoor show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.