Bigg Boss OTT 3 मध्ये 'वडापाव गर्ल'ची एन्ट्री; अनिल कपूर म्हणतात- "खूप भाव खातेस असं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 21:42 IST2024-06-21T21:39:32+5:302024-06-21T21:42:14+5:30
'बिग बॉस ओटीटी 3' ला सुरुवात झाली आहे. घरात दिल्लीची व्हायरल वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षितची एन्ट्री झालीय (bigg boss ott 3)

Bigg Boss OTT 3 मध्ये 'वडापाव गर्ल'ची एन्ट्री; अनिल कपूर म्हणतात- "खूप भाव खातेस असं..."
'बिग बॉस ओटीटी 3' ची शानदार सुरुवात झालीय. 'बिग बॉस ओटीटी 3' चं सूत्रसंचालन अनिल कपूर करत आहेत. 'बिग बॉस ओटीटी 3'च्या घरात दिल्लीच्या व्हायरल वडापाव गर्लची एन्ट्री झालीय. 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये सहभागी होणारी वडापाव गर्ल अर्थात चंद्रिका दीक्षित ही घरातली पहिली सदस्य आहे. 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये आल्या आल्याच अनिल कपूर यांनी चंद्रिकाची चांगलीच शाळा घेतली.
तू खूप भाव खातेस: अनिल कपूर
'बिग बॉस ओटीटी 3' च्या घरात दिल्लीच्या व्हायरल वडापाव गर्लची एन्ट्री झालीय. चंद्रिका दीक्षितने घरात आल्या आल्या अनिल कपूरला वडापाव खायला दिला. पुढे अनिल कपूरने चंद्रिकाला विचारलं, "तू वडापाव विकतेस. पण खूप भाव खातेस असं ऐकलंय'. यावर चंद्रिकाने उत्तर दिलं की, "सर माझी बोलण्याची पद्धत तशी आहे त्यामुळे अनेकांना वाटतं मी भाव खाते. पण असं नाहीय."
'बिग बॉस ओटीटी 3' ची ग्रँड सुरुवात
'बिग बॉस ओटीटी 3' ची उत्सुकता शिगेला आहे. या वेळी सलमान खान नव्हे तर अनिल कपूर 'बिग बॉस ओटीटी 3'चं सूत्रसंचालन करणार आहेत. त्यामुळे अनिल 'बिग बॉस ओटीटी 3' चं सूत्रसंचालन कसं करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. याशिवाय 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये कोणते स्पर्धक दिसणार याकडेही अनेकांचा डोळा आहे. अशातच 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचा खुलासा झालाय. Bigg Boss OTT 3 #AbSabBadlega आज २१ जूनपासून JioCinema Premium वर रात्री ९ वाजता बघू शकता