दोन पत्नींसह अरमान मलिक 'बिग बॉस'च्या घरात, करण कुंद्रा म्हणतो- "लोकांना एक बायको सांभळणं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 12:43 PM2024-06-27T12:43:29+5:302024-06-27T12:44:02+5:30
अरमान मलिकने पायल आणि कृतिका या त्याच्या दोन पत्नींसह 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतल्याने त्याला ट्रोलही केलं जात आहे. यावरुन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने संतप्त पोस्ट शेअर केली होती. आता अभिनेता करण कुंद्राने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी'च्या नव्या पर्वाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. यंदाच्या पर्वात अनेक नव्या गोष्टींचं सरप्राइज चाहत्यांना मिळालं. 'बिग बॉस ओटीटी ३'चा होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत...अनेक कारणांमुळे हा सीझन चर्चेत आहे. अनिल कपूर होस्ट करत असलेल्या या शोमध्ये युट्यूबर अरमान मलिकने त्याच्या दोन पत्नींसह एन्ट्री घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
अरमान मलिकने पायल आणि कृतिका या त्याच्या दोन पत्नींसह बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्याने त्याला ट्रोलही केलं जात आहे. यावरुन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने संतप्त पोस्ट शेअर केली होती. आता अभिनेता करण कुंद्राने यावर प्रतिक्रिया दिली आहे. "लोकांना एक बायको सांभाळणं कठीण जातं", असं म्हणत करणने त्याचं मत व्यक्त केलं आहे. करण कुंद्राचा एक व्हिडिओ समोर आला आहे. टेली रिपोर्टर या इन्स्टाग्राम पेजवरुन त्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओत तो म्हणतो, "अरमान भाई दोन पत्नींना घेऊन बिग बॉसच्या घरात गेला आहे. तुम्ही खरंच धन्य आहात. इथे लोकांना एक बायको सांभाळता येत नाही. आणि तू दोन बायका घेऊन बिग बॉसच्या घरात गेला आहेस. थोड्या दिवसांतच कळेल...क्लेश प्रो मॅक्स होईल बिग बॉसच्या घरात..".
अरमान मलिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याचे युट्यूबवर ७ मिलियनपेक्षाही जास्त सबस्क्रायबर्स आहेत. अरमान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. २०११ मध्ये त्याने पायल मलिकशी लग्न केलं होतं. त्यांना चिरायू नावाचा मुलगा आहे. त्यानंतर २०१८ मध्ये पायलची बेस्ट फ्रेंड असलेल्या कृतिकाच्या प्रेमात अरमान पडला आणि तिच्याशी दुसरं लग्न केलं. अरमानच्या दोन्ही पत्नी एकाच वेळेस गरोदर असल्याने मलिक कुटुंब चर्चेत आलं होतं. अरमान मलिकला त्याच्या दोन्ही पत्नींपासून ४ मुले आहेत.