Bigg Boss OTT 3 च्या फिनालेआधीच लवकेश कटारिया घराबाहेर! चाहत्यांनी बिग बॉसला केलं 'बॉयकॉट'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 10:08 AM2024-07-31T10:08:20+5:302024-07-31T10:11:41+5:30

Bigg Boss OTT 3 मध्ये लवकेश कटारिया घराबाहेर गेलाय. त्यामुळे चाहत्यांनी बिग बॉसवर आरोप केले आहेत (bigg boss ott 3)

Bigg Boss OTT 3 Lovekesh Kataria evicted fans demand boycott bigg boss | Bigg Boss OTT 3 च्या फिनालेआधीच लवकेश कटारिया घराबाहेर! चाहत्यांनी बिग बॉसला केलं 'बॉयकॉट'

Bigg Boss OTT 3 च्या फिनालेआधीच लवकेश कटारिया घराबाहेर! चाहत्यांनी बिग बॉसला केलं 'बॉयकॉट'

एकीकडे बिग बॉस मराठीचा नवीन सीझन सुरु झालाय. तर दुसरीकडे Bigg Boss OTT 3 मध्येही रंगत वाढलीय. Bigg Boss OTT 3 ची ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. Bigg Boss OTT 3 मध्ये फिनालेला काहीच दिवस बाकी असताना अरमान मलिकला घराबाहेर जावं लागलं. आता अरमाननंतर लवकेश कटारिया सुद्धा Bigg Boss OTT 3 मधून बाहेर पडलाय अशी चर्चा आहे. त्यामुळे फॅन्सकडून 'बॉयकॉट बिग बॉस' अशी मागणी करण्यात आलीय. 

लवकेश कटारिया घराबाहेर, फॅन्स चिडले

लवकेश कटारियाची सुरुवातीला स्वतःची काही ओळख नव्हती. एल्विश यादवचा मॅनेजर म्हणून त्याच्यावर टीकाही झाली. परंतु हळूहळू Bigg Boss OTT 3 मध्ये लवकेशने अफलातून खेळ खेळून स्वतःची ओळख बनवली. असं वाटत होतं लवकेश फिनालेमध्ये मजल मारेल. परंतु ग्रँड फिनालेला तीन दिवस बाकी असताना लवकेशला घराबाहेर जावं लागलंय. त्यामुळे चाहत्यांनी चिडून बॉयकॉट बिग बॉस हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवलाय.

 

बिग बॉस पक्षपातीपणा करतं,  चाहत्यांचे आरोप

लवकेश कटारिया घराबाहेर पडताच त्याचे चाहते आणि Bigg Boss OTT 3 पाहणारे फॅन्स चांगलेच रागावले आहेत. एका युजरने लिहिलंय की, "आमच्या भाईला शो जिंकून द्यायचा नव्हता तर त्याला शोमध्ये का बोलावलंं?", दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, "बिग बॉस ओटीटी फिक्स आणि बायस्ड आहे. गेल्या २० वर्षांपासून बिग बॉसने जो सन्मान मिळवला होता तो गमावला." अशा कमेंट करत चाहत्यांनी Bigg Boss OTT 3 बॉयकॉट करण्याची मागणी केलीय.

Web Title: Bigg Boss OTT 3 Lovekesh Kataria evicted fans demand boycott bigg boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.